कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड; 11 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

12 Aug, 05:23 (IST)

कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे गृहराज्यमंत्री म्हणाले, 'प्रकरणाची चौकशी व्हावी पण तोडफोड हा तोडगा नाही. या ठिकाणी आता अतिरिक्त सैन्य तैनात केले गेले आहे. उपद्रवींवर कारवाई केली जाईल.'

12 Aug, 04:42 (IST)

फेक फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने आपले निवेदन नोंदवण्यासाठी क्यूकी डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक सागर गोखले यांना समन्स बजावले आहे. एएनआयचे ट्वीट-

 

12 Aug, 04:05 (IST)

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून सुशांतसिंह राजपूत प्रकारांची चौकशी सुरु आहे. आज सुशांतची बहीण मितू सिंहची चौकशी करण्यात आली. नुकतीच ही चौकशी पूर्ण झाल्यावर मितू इंफोर्समेंट डायरेक्टरेट कार्यालयातून बाहेर पडली.

12 Aug, 03:51 (IST)

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कामत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेले 10 दिवस त्यांच्यावर Liver Cirrhosis बाबत उपचार सुरु आहेत. 

12 Aug, 03:21 (IST)

चिनी संस्था, त्यांचे भारतीय निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या विविध जागांवर शोध कारवाई असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाली- सीबीडीटी

12 Aug, 03:15 (IST)

शेल एजन्सीच्या सिरीजद्वारे काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहयोगी मनी लाँडरिंग आणि हवाला व्यवहारात गुंतल्याच्या माहितीच्या आधारे, या चिनी संस्था, त्यांचे निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या जागांवर शोध कारवाई केली गेल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.

12 Aug, 02:55 (IST)

पुणे शहरात आज 924 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 67,651 झाली आहे. आज पुण्यातून 1,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,705 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,30,041 झाली असून, आज 5,320 टेस्ट घेण्यात आल्या.

12 Aug, 02:38 (IST)

पावसाळ्यात केरळमधील कोझिकोड विमानतळावर Wide-Body विमानांना प्रवेश करण्यास तसेच उड्डाण आणि उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती विमानोड्डाण मंत्रालयाने दिली आहे.

12 Aug, 02:21 (IST)

महाराष्ट्रासोबत मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा विचार करता मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठी आहे. मुंबई महापालिकने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 917 रुग्ण सापडले. तर 1154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 48 रुग्णांची नोंद झाली.

12 Aug, 02:00 (IST)

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आज दिवसभरात राज्यात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. यातून बाकी राहिलेल्याची प्रकृती वैद्यकीय उपचारानंतर सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

12 Aug, 01:33 (IST)

राज्य सरकारने राज्यातील कोरोना व्हायरस चाचणीचे दर हे अधिक कमी केले आहेत. या चाचण्यांचे दर आता 1900 रुपयांवर आणण्या आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. हा दर सुरुवातील 4500 रुपये इतका होता. नंतर तो 2200 आणि नंतर 2000 रुपयांवरआला होता. राज्य सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणखी दिलासा मिळाला आहे.

12 Aug, 01:26 (IST)

मणिपूरच्या दक्षिणेस असलेल्या मोरंग परिसरात आज सायंकाळी 7.27 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंप मापन यंत्रावर 4.0 इतकी या भूकंपाची नोंद झाली, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

12 Aug, 24:59 (IST)

ज्या प्रकारचे शब्द माझ्याबद्दल वापरले गेले होते त्यामुळे दु: खी आणि व्यथित झाले आहे. मला वाटते की जे झाले गेले ते विसरावे. राजकारणात सभ्यतेची पातळी कायम ठेवली पाहिजे. वैयक्तिक वैरभाव निर्माण होऊ नये. हे पाहूनच विधानं केली गेली पाहिजेत, अशी भावना सचिन पायलट यांनी व्यक्त केली आहे.

12 Aug, 24:06 (IST)

प्रदीर्घ राजकीय संघर्षानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर ते राजसथानला दाखल झाले. या वेळी पायलट समर्थकांनी आय लव्ह यू.. सचिन पायलय आय लव्ह यू.... अशा घोषणा दिल्या.

12 Aug, 24:01 (IST)

मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. आज दिवसभरात या परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. या परिसरातील एकूण रुग्णांची संख्या आता 2,634 इतही झाली आहे.

11 Aug, 23:53 (IST)

मुंबई समुद्र किनारपट्टी लगतच्या भागात मुसळधर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या15 ऑगस्टपर्यंत हा अंदाज लागू असेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

11 Aug, 23:33 (IST)

संरक्षण अधिग्रहण परिषदेने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारतीय सशस्त्र दलांना आवश्यक असणारे विविध प्लॅटफॉर्म व उपकरणे भांडवल संपादनास मान्यता दिली. अंदाजे 8,722.38 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

11 Aug, 23:13 (IST)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (11 ऑगस्ट) तीन तास सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तीवाद ऐकून घेतले आणि त्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. दरम्यान, येत्या गुरुवारपर्यंत (13 ऑगस्ट) सर्व पक्षकारांनी आपला संक्षीप्त अहवाल न्यायालयाकडे जमा करावा असेही आदेश दिले.

11 Aug, 22:53 (IST)

प्रसिद्ध शायर, गझलकार राहत इदौरी यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन. ते 70 वर्षांचे होते. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

11 Aug, 22:33 (IST)

सुशांत सिंह  राजपूत च्या मृत्यूप्रकरणी पाटणाहून मुंबईत एफआयआर हस्तांतरित करण्याची मागणी करणार्‍या रिया चक्रवर्ती च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना गुरुवार 13 ऑगस्टपर्यंत आतापर्यंत संकलित केलेले सर्व पूर्वनिर्णय कोर्टासमोर मांंडण्यास सांगितले आहे.

Read more


आज 11 ऑगस्ट रोजी देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिल्ली, मथुरा, वृंंदावनात जन्माष्टमी निमित्त विशेष पुजा पार पडतील मात्र कोरोनाच्या संंकटामुळे भाविकांंना मंंदिरात प्रवेश नसेल. अनेक मंंदिरांकडुन कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासुन अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन या सणाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. सणाच्या उत्साहात कुठेही कोरोनाच्या बाबत हलगर्जी पणा केला जाउ नये यासाठी विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. उद्या सुद्धा याच पार्श्वभुमीवर दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. Happy Janmashtami 2020 Messages: श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status वर शेअर करुन साजरा करा कृष्ण जन्मोत्सव

दुसरीकडे जम्मू-काश्मीर मध्ये रामबानमधील बटोटे येथे अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान पोलिस आणि वनविभागाच्या 18 जवानांवर हल्ला झाल्याने ते जखमी झाले. डीएफओ कुलदीप सिंह यांच्या माहितीनुसार, अतिक्रमण करणार्‍यांसह काही समाजकंटकांनी आमच्या पथकावर हल्ला केला आणि दगडफेक केली. या अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, आज देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रात आज मान्सुन सक्रिय राहणार असुन, मुंंबई, पुणे, कोकण, रायगड, सातारा या भागात अधिक पाउस होईल अशी शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now