झारखंड येथे आज 2 हजार 64 कोरोनाबाधित आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 43 हजार 833 वर पोहचली आहे. यापैकी 428 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 28 हजार 149 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्विट-
ओडिशा राज्यातील खोरदा आणि पुरी येथे महापूर आला आहे. अग्निशम दलाच्या जवानांनी महापुरात अडकलेल्या 115 जणांना वाचविले. पुरग्रस्तांना मदत साहित्य वितरीत केले आहे. पुरात अडकलेल्या एका माकडालाही जवानांनी वाचवले., अशी माहिती ओडिशाच्या अग्निशमन दल विभाग प्रमुखांनी दिली आहे.
मुंबईत आज आणखी 1 हजार 142 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 46 हजार 947 वर पोहचली आहे. यापैकी 7 हजार 690 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 20 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरु आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आज तब्बल 15 हजार 765 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 8 हजार 306 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट-
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात आरोपी वाईझ-उल-इस्लाम ने नीट परीक्षा द्यायची असल्याचे सांगत जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन 3 सप्टेंबर रोजी सूचीबद्ध आहे व याप्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी आहे. या जामीनाला NIA चे वकील विपिन कालरा यांंनी विरोध दर्शवला आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व 13 सदस्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन यांनी सांगितले आहे.
JEE,NEET 2020 परीक्षार्थींच्या सोयीसाठी 1-6 सप्टेंबर दरम्यान पश्चिम वर 46 विशेष लोकल अधिक धावणार असल्याची माहिती आज Western Railway कडून देण्यात आली आहे. दरम्यान कालच त्यांनी अॅडमीट कार्डवर परीक्षार्थी आणि पालकांना प्रवासाची मुभा देत असल्याचं घोषित केलं आहे.
गणेश भक्तांनी जुहू समुद्र किनारी येऊन बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात केली आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी 10 दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीचे विसर्जन होणार आहे.
विदर्भामध्ये दुथडी भरून वाहणार्या नद्यांमुळे अनेक गावं पूरग्रस्त झाली आहे. दरम्यान गोंदिया सोबत आज चंद्रपूरात NDRF टीम कडून लडाज गावामध्ये पूरग्रस्तांसाठी बचावकार्य सुरू आहे. आता हळूहळू पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे.
काल भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर आज दिल्लीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान आम्हांला त्यांना पश्चिम बंगालला न्यायचं होतं पण कोविडमुळे शक्य नाही. ते आमच्या कुटुंबाचे आधार होते त्यांना आम्ही मिस करू. तसेच त्यांच्या मृत्यूच्या कारणामध्ये कोविड पेक्षा मेंदूवरील शस्त्रक्रिया अधिक जबाबदार ठरली अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेची नासधूस सुरू झाली. तेव्हापासून केंद्राने एकामागून एक 'चुकीचे' धोरण आणले अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.
आज पासुन देशभरात जेईई परिक्षेला सुरुवात होत आहे. सर्व परिक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, परीक्षेचं अॅडमिट कार्ड पाहून स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक जारी करुन देण्यात आली आहे.
दुसरीकडे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee Death) यांंच्या निधनानंंतर आज राष्ट्रपती भवन व संंसदेवरील तिरंंगा अर्ध्यावर आणण्यात आला आहे. देशभरात सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समजत आहे यानुसार देशातील शासकीय इमारतींंवरील झेंंडा अर्ध्यावरच आणला जाईल तसेच सात दिवस मनोरंंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही असे सांंगण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, आज अनंंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) च्या मुहुर्तावर देशभरात बाप्पा आपल्या भाविकांंचा निरोप घेणार आहेत. कोरोनाचे संंकट पाहता मोठमोठ्या गणेश मंंडळानी सुद्धा मंडपातच कृत्रिम तलाव/हौद तयार करुन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींंचे व मुंंबईतील गणेशगल्ली, चिंंचपोकळीचा चिंंतामणी येथील गणेश मुर्तींंचे विसर्जन सुद्धा अशाच पद्धतीने पार पडेल.