Lockdown: नागरिकांना गावी जाण्साठी गृह मंत्रालयाची नियमावली; 1 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

02 May, 04:39 (IST)

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. जी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

02 May, 04:09 (IST)

प्रवासी मजुरांना घेऊन जाणारी 'श्रमिक स्पेशल ट्रेन' नाशिक रेल्वे स्थानकातून भोपाळ, मध्य प्रदेशला रवाना झाली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

02 May, 03:04 (IST)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहेत.  मुंबईत आज कोरोनामुळे 751 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 625 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

02 May, 02:50 (IST)

महाराष्ट्रातील नांदेडमधील हजूर साहिब येथून पंजाबमध्ये परतलेल्या 137 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पंजाबचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री ओपी सोनी यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

02 May, 02:23 (IST)

महाराष्ट्रात आज 1008 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11,506 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 485 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

02 May, 01:47 (IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत 227 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 30 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

02 May, 01:17 (IST)

लॉकडाऊन काळात 390 किलोमीटरचा सायकल प्रवास केल्यानंतर 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 

01 May, 23:59 (IST)

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत गृह मंत्रालयानने पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी लॉकडाऊन वाढविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे देशात 17 में पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. (अधिक माहितीसाठी वाचा - Lockdown कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

 

 

01 May, 23:31 (IST)

गेल्या 24 तासांत देशात 1755 जणांना कोरोनाची लागण झाली असून 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

01 May, 22:56 (IST)

मुंबईतील वडाळा येथील एकाच पोलिस स्टेशनमधील 9 पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये 106 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

 

 

 

01 May, 22:49 (IST)

लखनऊ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील मजुरांशी संवाद साधला.

 

01 May, 22:27 (IST)

चंदिगड मध्ये कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 88 वर पोहोचली असून यातील 18 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

 

01 May, 21:58 (IST)

Lockdown मुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना विशेष रेल्वेने आपल्या गावी परत जाण्यासाठी गृह मंत्रालयाने परवानगी दिली असून त्या आशयाचे पत्रक जारी करण्यात आले आहे.

01 May, 21:39 (IST)

पुण्यात आज 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या ही 99 पोहोचली असल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाने दिली आहे.

01 May, 20:57 (IST)

एकीकडे उन्हाळा वाढत असल्याचे चित्र निर्माण होत असताना हैदराबाद शहरातील काही भागात पावसाने शिडकाव केला आहे. पाहा ANI चे फोटोज

01 May, 20:47 (IST)

पालघर प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या 5 जणांना 13 मे पर्यंत CID कोठडी ठोठोवण्यात आली आहे. 

01 May, 20:26 (IST)

नवी दिल्ली सह मुंबई, कोलकाता आणि चेन्नई मध्ये LPG सिलेंडरच्या सब्ससिडीच्या दरात घट झाली आहे. यात नवी दिल्लीत 162.50, कोलकाता मध्ये 190 रुपये, मुंबईत 135.5 रुपये तर चेन्नई मध्ये 192 रुपयांनी कमी झाले आहे.

01 May, 20:13 (IST)

बिहार मध्ये 18 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले असून या राज्यात कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 450 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली आहे.

01 May, 20:02 (IST)

ओडिशामध्ये 4 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून येथील कोविड रुग्णांची एकूण संख्या 147 वर पोहोचली असल्याची माहिती येथील राज्य जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.

01 May, 19:19 (IST)

पालघर मॉब लिचिंग प्रकरणी आज आणखी 5 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. यात आतापर्यंत एकूण 115 जणांना अटक करण्यात आली असून यातील 9 जण अल्पवयीन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Read more


महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (B S Koshyari) यांनी विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार या रिक्त असलेल्या 9 जागांवरील निवडणुकांबाबत भारतीय निवडणूक आयोगाची बैठक आज पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून घटनात्मक पेचही उद्भवला आहे. हा पेच सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री प्रयत्न करत आहेत. अशात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात यावर महविकासआघाडी सरकारचे भवितव्य अवलबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भारतात सद्य स्थितीत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 33,610 वर पोहोचली आहे. यात 8373 इतके रुग्ण बरे झाले असून 1075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्या 10,498 झाली आहे. आज राज्यात एकूण 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 1773 लोकांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे, त्या पैकी आज 180 जणांना सोडण्यात आले. तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6,874 इतकी झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now