फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा; 1 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

02 Mar, 04:47 (IST)

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी आढळल्यानंतर त्यांना तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ट्वीट-

 

02 Mar, 03:52 (IST)

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लखनौमध्ये 5 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

02 Mar, 03:28 (IST)

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विट-

 

02 Mar, 03:00 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 406 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 3 हजार 108 इतकी झाली आहे. ट्वीट-

 

02 Mar, 02:19 (IST)

मुंबईस्थित कार्यकर्ता वकील निकिता जेकबने 'टूलकिट' प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्यासमोर सुनावणी होईल.

02 Mar, 01:33 (IST)

महाराष्ट्र राज्यात आज 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5754 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2030458 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77618 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.94% झाले आहे.

02 Mar, 01:31 (IST)

फास्टॅगमुळे 20,000 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झाली आहे. टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ आणखी कमी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

02 Mar, 24:50 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोरोना विषाणू लसचा पहिला डोस घेतला. त्यांना मेदांता रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही लस दिली.

02 Mar, 24:10 (IST)

बंगाली अभिनेत्री Srabanti Chatterjee कोलकात्यात भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली.

01 Mar, 23:24 (IST)

फेब्रुवारी महिन्यातील एकूण जीएसटी महसूल 1,13,143 कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी 21,092 कोटी रुपये, एसजीएसटी 27,273 कोटी रुपये, आयजीएसटी 55,253 कोटी रुपये आणि सेस 9,525 कोटी रुपये आहे. महसूल विभागाने ही माहिती दिली.

01 Mar, 22:49 (IST)

जेव्हा मुंबईत वीज गेली होती तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी समिती गठित केल्या होत्या. आता सध्याचे सायबर हल्ल्याबाबतचे मिडिया रिपोर्ट्स सत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सायबर सेल आज सायंकाळी सहा वाजेपर्यत हा अहवाल गृहमंत्री देशमुख यांना सादर करेल, असेही ते म्हणाले.

When power went out in Mumbai, I had said that there was something wrong & had constituted 3 committees to probe. I feel media reports that have surfaced are true. Cyber cell will submit report on this by 6pm today to Home Minister Deshmukh: Maharashtra Energy Minister Nitin Raut https://t.co/zX3WkfbQeB pic.twitter.com/DK6iZ0nDTg

01 Mar, 22:03 (IST)

वैंकय्या नायडू यांनी  कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

01 Mar, 21:39 (IST)

Saradha scam case प्रकरणी टीएमसी नेते कुणाल घोष यांना 2 मार्च पूर्वी हजर राहण्याची ईडी कडून नोटीस धाडण्यात आली आहे.

01 Mar, 21:34 (IST)

दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील अभियान अद्याप सुरु आहे. 

01 Mar, 21:11 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील जेजे रुग्णालयात  कोरोनाची लस घेतली आहे.

01 Mar, 21:09 (IST)

दिल्लीतील नागलोगी परिसरात व्यक्तीवर करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

01 Mar, 20:48 (IST)

कर्नाटक: रामास्वामी पार्थसारथी या 97 वर्षाच्या व्यक्तीने बंगळुरुच्या मनिपाल हॉस्पिटलमध्ये आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. येथे लसीकरण करणारी ती पहिलीचं व्यक्ती ठरली आहे.

 

 

 

01 Mar, 20:21 (IST)

बिहारच्या खगारीया जिल्ह्यातील स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

01 Mar, 20:14 (IST)

नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांना मेड इन इंडिया लसीचा पहिला डोस मिळाला.

01 Mar, 19:57 (IST)

मुंबईत वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ला असल्याच्या मिडिया अहवालाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी सायबर विभागाकडून अहवाल मागविला आहे.

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात कोरोनावरील लस घेतली आहे. तर आजपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लस शासकीय रुग्णालय किंवा केंद्रामध्ये घेता येणार आहे. परंतु खासगी रुग्णालय किंवा केंद्रात जर लस घ्यायची असल्यास त्यासाठी मात्र नागरिकांना 250 शुल्क मोजावे लागणार आहे. आतापर्यंत लसीकरण फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी केले जात होते. त्यानंतर आता एक मार्च पासून सामान्य नागरिकांना सुद्धा लसीकरण दिले जाणार आहे. तर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीकरणासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी वाढवली जात आहे. आयुष्यमान भारत पीएमजेएवाय अंतर्गत जवळजवळ 10 हजार रुग्णालय आणि सीजीएचएस अंतर्गत 687 रुग्णालयांचा लसीकरणासाठी वापर केला जाऊ शकतो.

तर महाराष्ट्र राज्याच्या  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. यंदा 10 दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून, प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेरणार आहेत. तर दुसरीकडे सरकार देखील आपण केलेल्या कामांचा लेखाजोगा अधिवेशनात सादर करतील. वीज बिल, मंत्र्यांवरील आरोप, शक्ती कायदा, कोरोना व्हायरसची राज्यातील परिस्थिती यांसारख्या अनेक मुद्दयांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहे. तसेच मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आता महापालिकेसह मुंबई पोलिसांना दंड आकारण्यास परवानगी दिली गेली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now