Muhurat Trading 2024: शेअर बाजारात आज 1 तासाचा ट्रेडिंग मुहूर्त; बाजार कधी उघडणार? काय असेल खास? जाणून घ्या
दिवाळीच्या निमित्ताने आज एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येणार आहे.
Muhurat Trading 2024: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading 2024) ला खूप महत्त्व आहे. या विशेष ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदार त्यांचे नशीब आजमावतात. तुम्हीही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगची आतुरतेने वाट पाहत असाल. दिवाळीच्या निमित्ताने आज एक तासाचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) आयोजित करण्यात येणार आहे. स्टॉक मार्केट एक्स्चेंज (Stock Market Exchange) ने 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 ते 7:00 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग सत्र निर्धारित केले आहे.
गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की, सत्र संपण्याच्या 15 मिनिटे आधी सर्व इंट्राडे पोझिशन्स आपोआप संपुष्टात येतील. म्हणून, जर तुम्ही इंट्राडे व्यापाराची तयारी करत असाल तर तुम्हाला अतिशय सावध असण्याची गरज आहे. (हेही वाचा - Indian Stock Market Closed Today? भारतीय शेअर बाजार आज बंद? दिवाळी सुट्टी किती दिवस? घ्या जाणून)
मुहूर्त ट्रेडिंगचे महत्त्व -
भारतात, स्टॉक ब्रोकर्स त्यांच्या आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून दिवाळी पाळतात. अनेक गुंतवणूकदार या कालावधीत शेअर्स खरेदी करणे हे येत्या वर्षासाठी समृद्धीला आमंत्रण देण्याचा एक मार्ग मानतात. गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची ही वेळ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बीएसई सेन्सेक्स गेल्या 17 मुहूर्तांपैकी 13 मुहूर्तांमध्ये वाढीसह बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स 2008 मध्ये सर्वाधिक वाढला, 5.86 टक्क्यांनी वाढून 9,008 वर पोहोचला. (हेही वाचा, Diwali 2024 Greetings: दिवाळी सणाच्या Greetings, Quotes, GIF Greetings, Photo Messages आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या हटके शुभेच्छा संदेश)
मुहूर्ताच्या व्यवहारात रणनीती काय असावी?
बाजार तज्ञांनी मुहूर्त ट्रेडिंग 2024 संदर्भात लार्ज कॅप स्टॉकवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी, मिड कॅप समभागांमध्ये हुशारीने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो, कारण मिड किंवा स्मॉल कॅप समभागांचे उच्च मूल्यांकन सुरक्षिततेसाठी कमीत कमी मार्जिन प्रदान करतात. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार आज धातू, भांडवली वस्तू, आरोग्यसेवा आणि लार्ज कॅप आयटीसारख्या क्षेत्रांना प्राधान्य देऊ शकतात.
दरम्यान, मुहूर्त ट्रेडिंग टाइम स्लॉटमध्ये इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्हज, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सारख्या अनेक विभागांमध्ये ट्रेडिंग दिसेल.