व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर येणाऱ्या फसव्या लिंकला बळी पडू नका- ठाणे शहर पोलीस; 1 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

शेतकरी आंदोलनासोबतच शेती, क्रीडा, साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, उद्योगविश्व, इंटरनेट, डिजिटल वर्ल्ड आणि इतर क्षेत्रातील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

02 Feb, 05:11 (IST)

व्हॅलेंटाईन डे च्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन गिफ्ट्स स्कीम, ताज हाँटेल गिफ्ट कार्ड्स स्कीम्स इ. बाबत फसव्या लिंक प्रसारीत होत आहेत. नागरिकांनी अशा फसव्या लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ट्विट-

 

02 Feb, 04:38 (IST)

सोमवारी संसदेत सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प त्यांच्या मासिक खर्चावर जोर देईल, असे सुमारे 56 टक्के लोकांचे मत आहे, तर केवळ 16.1 टक्के लोक म्हणतात की, या अर्थसंकल्पामुळे त्यांच्या हातात जास्त पैसा राहील. आयएएनएस सी-व्हॉटर बजेट इंस्टा-पोल मधून ही बाब समोर आली आहे.

02 Feb, 03:56 (IST)

कोरोना व्हायरस संबंधित समस्या असूनही चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस रेल्वेचे परिचालन प्रमाण 96.96 टक्केपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वे मंडळाचे सदस्य नरेश सालेचा यांनी ही माहिती दिली.

02 Feb, 03:26 (IST)

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 26 जानेवारी हिंसाचार प्रकरणी आकाश प्रीत सिंह यास अटक केली आहे. त्याच्यावर सीआयएसएफच्या जवानांवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 44 एफआयआर नोंदविण्यात आले असून 128 लोकांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.

02 Feb, 03:01 (IST)

निषेध संघटनांनी इंटरनेट बंदी, अर्थसंकल्प आणि इतर समस्यांमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या विरोधात 6 फेब्रुवारी रोजी देशभरात 3 तास चक्का जाम जाहीर केला आहे.

02 Feb, 02:14 (IST)

येत्या 6 फेब्रुवारीपासून सामान्य जनतेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रपती भवन खुलं होणार आहे.

02 Feb, 02:00 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 3289 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 19 लाख 32 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

02 Feb, 01:32 (IST)

मुंबईत आज दिवसभरात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 11,359 वर पोहोचली आहे.

02 Feb, 01:27 (IST)

कुछ लोग बोल रहे है ये बजेट खाली जुमला है, लेकिन मेरा ये कहना है ये विरोधी दलोंपर हमला आहे अशी प्रतिक्रिया आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिली आहे.

02 Feb, 01:12 (IST)

आजचे बजेट हे खूप संतुलित असून कोविडच्या काळात किती काम करावे लागले तरीही या बजेटमध्ये सर्व गोष्टी संतुलित ठेवण्यात आल्या अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी दिली आहे.

02 Feb, 24:46 (IST)

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये मेड इन इंडिया कोरोना लस पोहोचली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

02 Feb, 24:24 (IST)

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेले बजेट हे आत्मनिर्भर भारताचे बजेट आहे अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.

01 Feb, 23:54 (IST)

वित्तमंत्रीन निर्मला सीतारमण यांनी सादर केलेले अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा असल्याची टिका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

 

01 Feb, 23:16 (IST)

पुण्याचे दक्षिणी सैन्य कमांडर सी पी मोहंती यांनी आज दिल्लीत लेफ्टनंट जनरल म्हणून पदभार स्विकारला.

01 Feb, 22:50 (IST)

एफएम निर्मला सीतारमण यांनी लोकांची फसवणूक केली. विशेषत: गरीब, कामगार वर्ग, स्थलांतरित आणि शेतकरी घोर निराशा केली असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितले.

01 Feb, 22:31 (IST)

अमेरिकेने म्यानमारमधील सत्तांतर अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला थेट इशारा देत म्हटले आहे की, याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या सरकारविरुद्ध अशा प्रकारे सत्तांतर करणे गंभीर आहे. या प्रकारबद्दल कारवाई केली जाईल, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

01 Feb, 22:01 (IST)

मान, मती, माणुस (टीएमसी) चे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. चिंता करुन का. भाजप हा केवळ हवा भरलेला फुगा आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

01 Feb, 21:41 (IST)

केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने अन्याय केला आहे.  महाराष्ट हे देशभरात सर्वाधिक कर देणारे राज्य आहे. परंतू, असे असतानाही या राज्याला अर्थसंकल्पात काही मिळाले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

01 Feb, 21:17 (IST)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस एस पूनावाला आणि कार्यकारी संचालक नताशा पूनावाला यांनी आज उपराष्ट्रपती निवास येथे उपाध्यक्ष एम. व्यैंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि संस्थेच्या अलिकडच्या काळात झालेल्या प्रगतीबद्दल त्यांना अवगत केले: उपराष्ट्रपती

01 Feb, 20:54 (IST)

अनेकांना वाटले की आम्ही सामान्यांवर कराचा बोजा टाकू पण आम्ही पारदर्शक अशा बजेटवर लक्ष केंद्रित केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Read more


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत आज सकाळी 11 वाजता सादर करत आहेत. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना व्हायरस संकटातून सावरत असताना अर्थव्यवस्थेला बसलेला हादरा आणि सरकारची ध्येयधोरणे यांमुळे गाळात रुतलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प जाहीर होत आहे. सहाजिकच अर्थसंकल्पाबाबत नेहमी असती तशी उत्सुकता आहे. मात्र, या वेळची उत्सुकता काहीशी वेगळी आहे. केंद्र सरकारने संसदेत घाईगडबडीत कृषी कायदे मंजूर केले आणि देशभरातील शेतकरी आक्रमक झाला. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेती कायदे मागे घ्या अशी त्यांची मागणी आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्याच्या 6-7 वर्षांत प्रथमच अशा प्रकारचा तीव्र विरोध होत आहे. अशा पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर होत आहे.

अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारसमोर आव्हानेही तितकीच मजबूत आहेत. विकासदरवृद्धीसोबतच उद्योजक आणि विविध क्षेत्रांना दिलासा देत असताना सर्वसामान्यांच्या झोळीतही बरेच काही टाकण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. कोरोना काळात लकडाऊन असताना केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे. परंतू, ते फारसे प्रभावी ठरलेच नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या पदरात काय दान टाकते याबाबत उत्सुकता आहे.

सर्वाधिक उत्सुकता आहे की, अर्थसंकल्पात शेती, उद्योग, ऑटो आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला काय मिळते. याशिवाय नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गाचे समाधान करण्यात हा अर्थसंकल्प किती आणि कसा यशस्वी ठरतो. शिवाय तळागाळात असणाऱ्या गरीब वर्गाला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार काही योजना, सवलत जाहीर करते का? याबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पासोबतच विविध क्षेत्रातील मिळून सुमारे 20 विधेयके लोकसभेत मांडली जाणार आहेत. यात प्रामुख्याने भारतीय स्पर्धा आयोग सुधारणा, खासगी आभासी चलनावरील बंदी, वीज वितरण क्षेत्र परवानामुक्त करणारे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी प्राधिकरण सुधारणा, नवीन वित्तीय विकास संस्था, अशा विधेयकांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनासोबतच शेती, क्रीडा, साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, उद्योगविश्व, इंटरनेट, डिजिटल वर्ल्ड आणि इतर क्षेत्रातील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement