चित्रदुर्ग: सिद्दम्मा नावाच्या 110 वर्षांच्या आजींची कोरोना व्हायरसवर मात; 1 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

02 Aug, 05:25 (IST)

सिद्दम्मा नावाच्या 110 वर्षांच्या आजींनी कोरोना व्हायरसवर मात दिली असून, आज बरे झाल्यावर त्यांना चित्रदुर्गातील कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. 27 जुलै रोजी त्यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली होती. चित्रदुर्गच्या डॉ. बसवराज, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याबाबत माहिती दिली.

02 Aug, 04:52 (IST)

पुणे शहरात नव्याने 1,506 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 55,761 झाली आहे. सध्या 1,791 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 17,512 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,79,255 झाली असून आज 5,863 टेस्ट घेण्यात आल्या.

02 Aug, 04:28 (IST)

पुणे जिल्ह्यातील चाकण भागातील एका कंपनीच्या किमान 76 कामगारांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

02 Aug, 04:14 (IST)

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शरदाताई टोपे यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 02 ऑगस्ट रविवारी सायंकाळी 04:00 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड जिल्हा जालना येथे होईल. ट्विट- 

 

02 Aug, 04:00 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते अहमदनगरमध्ये आज ‘मिशन झिरो’ला सुरुवात करण्यात आली आहे.  ट्वीट- 

 

02 Aug, 03:32 (IST)

बिहारमधील पूरात आणखी दोन जणांचा बळी गेला आहे व यासह मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. नद्यांचे पाणी राज्याच्या उत्तरेकडील भागात पोहोचल्यामुळे एकूण 50 लाख लोकांना फटका बसला आहे.

02 Aug, 03:07 (IST)

कोरोना व्हायरसमुळे पश्चिम रेल्वेला होणाऱ्या मिळकतीमध्ये जवळजवळ 1,959 कोटींचा तोटा झाला आहे. यामध्ये अंदाजे रु. 291 कोटी उपनगरी विभागासाठी आणि 1,668 कोटी रुपये नॉन-उपनगरीय भागांसाठी आहे. पश्चिम रेल्वेने याबाबत माहिती दिली.

02 Aug, 02:41 (IST)

मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,059 रुग्णांची व 45 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,15,346 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 832 रुग्ण बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत 87,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

02 Aug, 02:10 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 9601 रुग्ण आढळून आले असून 322 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे, राज्यातील COVID19 चा आकडा 4,31,719 वर पोहचला आहे.

02 Aug, 02:08 (IST)

अहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 146 रुग्ण आढळून आल्याने आखडा 26,663 वर पोहचला आहे.

02 Aug, 01:59 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलीस यांच्याकडून रुमी जाफरी हिची चौकशी करण्यात आली आहे.

02 Aug, 01:39 (IST)

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 264 रुग्ण आढळून आल्याने आकडा 7447 वर पोहचला आहे.

02 Aug, 01:18 (IST)

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज 613 जणांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 972 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

02 Aug, 24:41 (IST)

चंदीगढ येथे कोरोनाबाधितांचा आकडा 1079 वर पोहचला आहे.

02 Aug, 24:27 (IST)

नागपूर मधील कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.

02 Aug, 24:02 (IST)

तमिळनाडू येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 5879 रुग्ण आढळून आले असून 99 जणांचा बळी गेला आहे.

01 Aug, 23:49 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 1129 रुग्ण आढळून आल्याने आकडा 10,862 वर पोहचला आहे.

01 Aug, 23:35 (IST)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते शिक्षकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून Psychological Counselling Training Workshop चे उद्घाटन करण्यात आले आहे.

01 Aug, 22:59 (IST)

Smart India Hackathon 2020 मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

01 Aug, 22:40 (IST)

राम मंदिराच्या भुमिपूजनासाठी तब्बल 1.25 लाख मातीचे दिवे तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

Read more


आज देशात सर्वत्र ईद-उल-अजहा (Eid Ul Azha) अर्थात बकरी ईद (Bakri Eid) सण उत्सहात साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना लिहिलेल्या पत्रात बांगलादेशाने कोरोना संकटाशी लढण्यासाठी उचललेल्या पावलांची प्रशंसा केली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात बांगलादेशने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांमध्ये मदतीसाठी भारत सदैव तत्पर राहील, असं आवाहनदेखीर मोदींनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या ट्विट हँडलवरून मुस्लिम बांधवांना 'ईद-उल-अजहा' तथा 'बकरी ईद'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोना संकट लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी 'बकरी ईद' साधेपणानं साजरी करावी. सोशल डिस्टन्सिंग राखावं, सामुहिक नमाज पठण टाळून घरीच नमाज अदा करा. रमजान काळात केलेलं सहकार्य यावेळीही करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

याशिवाय आज थोर समाजसेवक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली जात आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केलं आहे. तर दुसरीकडे मुंबई - दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज राज्यातील विविध भागात आज पहाटेपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now