Guidelines For Elections During COVID-19: कोरोना काळात सार्वत्रिक निवडणूक, पोट निवडणुका आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

देशातील कोविड-19 संक्रमण परिस्थिती पाहता, केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय वेळोवेळी नियमावली जाहीर करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अगदी अलिकडील म्हणजेचं 29 जुलै 2020 च्या अध्यादेशात देशभरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना/निर्देश जारी केले आहेत.

Election Commission of India (PC - Twitter)

Guidelines For Elections During COVID-19: भारतीय निवडणूक आयोगाने कोविड-19 च्या परिस्थितीत सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुका आयोजित करण्यासंबंधी व्यापक मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे. देशातील कोविड-19 संक्रमण परिस्थिती पाहता, केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय वेळोवेळी नियमावली जाहीर करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अगदी अलिकडील म्हणजेचं 29 जुलै 2020 च्या अध्यादेशात देशभरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना/निर्देश जारी केले आहेत.

याशिवाय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि कोविड-19 च्या प्रसाराच्या प्रतिबंधासाठी मानक प्रणाली जाहीर केली आहे. याअगोदर, निवडणूक आयोगाने 17 जुलै 2020 रोजी, राष्ट्रीय/राज्य राजकीय पक्षांची मते/सूचना 31 जुलै 2020 पर्यंत मागवल्या होत्या. त्यानंतर राजकीय पक्षांच्या विनंतीनुसार ही मुदत 11 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आयोगाने विविध राजकीय पक्षांची आणि राज्य, केंद्रशासित प्रदेशांतील निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभा संदर्भातील मते/सूचना विचारात घेतल्या आहेत. (हेही वाचा - National Sports Awards 2020: रोहित शर्मा, टेबल-टेनिस चॅम्पियन मनिका बत्रासह चौघांना खेल रत्न पुरस्कार जाहीर; पाहा अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण लिस्ट)

मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्ये -

संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्वसमावेशक राज्य/जिल्हा आणि विधानसभा निवडणुकींसाठी निवडणूक योजना तयार करतील. संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेशातील कोविड-19 संबंधित नोडल अधिकाऱ्याशी सल्लामसलत करुन या योजना तयार केल्या जातील.