आशिया खंडातील सर्वात श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी; प्रत्येक तासाला 7 कोटी रुपयांची कमाई
आशिया व भारतामधील सर्वात श्रीमंत लोकांची नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे.
आशिया व भारतामधील सर्वात श्रीमंत लोकांची नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतात प्रत्येक महिन्याला 3 नवीन अब्जाधीश निर्माण होतात. आशिया खंडातील तसेच भारतातील सर्वात श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी आहेत. 'हुरुन ग्लोबल रिच यादी 2020 (Hurun Global Rich List 2020) मध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
हरुन ग्लोबल रिच लिस्ट 2020 च्या अहवालानुसार, मुकेश अंबानी जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींची एकूण मालमत्ता 6 हजार 700 कोटी डॉलर आहे. 2019 मध्ये मुकेश अंबानी यांनी दर तासाला 7 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या भारतातील अब्जाधीशांची संख्या 138 झाली आहे. तसेच भारत सर्वात जास्त अब्जाधीशांच्या यादीच्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढून 170 झाली आहे. चीन आणि अमेरिकेत सध्या सर्वाधिक अब्जाधीश असून यात भारताचा तिसरा क्रमांक आहे. (हेही वाचा - नंदूरबार: भाजपच्या महिला खासदार डॉ. हिना गावित लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार; पहा कोण आहेत त्यांचे होणारे पती
विशेष म्हणजे भारतातील 138 अब्जाधीशांपैकी सर्वात जास्त 50 अब्जाधीश हे मुंबईचे आहेत. तसेच 30 अब्जाधीश हे दिल्ली तर 17 अब्जाधीश हे बंगळुरू येथील आहेत. जगात सर्वात श्रीमंताच्या यादीत अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस सर्वोच्च स्थानी आहेत. भारतात सर्वोत श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर हिंदुजा परिवारचा क्रमांक लागतो. हिंदुजा परिवाराची एकूण संपत्ती 2700 कोटी डॉलर ऐवढी आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी यांचं नाव आहे. अदानी यांची संपत्ती 1700 कोटी डॉलर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2020 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

