MS Dhoni Retires: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी राजकारणात प्रवेश करणार? भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण
धोनी हा आगामी टी-20 विश्वचषकात सहभागी होईल, अशी आशा त्याच्या अनेक चाहत्यांना होती. परंतु, त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शनिवारी (15 ऑगस्ट) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. मात्र, धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसत आहे. यातच भाजपकडून धोनीला विशेष ऑफर देण्यात आली आहे. झारखंडमध्ये 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक धोनीने लढवावी, असा सल्ला भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्मामी (Subramanian Swamy) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. यामुळे धोनी राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. “एम.एस.धोनी हा केवळ आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. अन्य कोणत्याही बाबींमधून निवृत्ती घेत नाही. त्याने जे कौशल्य आणि संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला 2024 ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Suresh Raina Retires: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्वीट-
धोनी हा आगामी टी-20 विश्वचषकात सहभागी होईल, अशी आशा त्याच्या अनेक चाहत्यांना होती. परंतु, त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. चेन्नईचा संघ 20 ऑगस्टनंतर युएईला रवाना होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)