भारतात Mpox चा दुसरा संशयित आढळला, UAE हून केरळला गेलेला व्यक्ती Positive

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर केरळमध्ये एकाला मंकीफॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बाधित व्यक्तीवर उपचार सरू आहेत.

Mpox Outbreak (Photo Credits: Representative Image)

Second Case Found: हरियाणातील हिस्सार येथे 26 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची(Monkeypox) लागण झाली होती आणि त्याला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच आता आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. केरळ(Monkeypox Case in Kerala) सरकारने आज बुधवारी याची पुष्टी केली. केरळ सरकारच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की,मलप्पुरममधील 38 वर्षीय पुरुषाची यूएईहून परतल्यानंतर मंकीपॉक्सची चाचणी सकारात्मक आली आहे.

फेसबुकवरील एका पोस्टमध्ये जॉर्ज यांनी लोकांना या आजाराशी संबंधित कोणतीही ज्ञात लक्षणे दिसल्यास उपचार घेण्याचे आणि आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: भारतामध्ये mpox चा शिरकाव; हरियाणाचा 26 वर्षीय तरूण बाधित असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती)

WHO ने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित

गेल्या महिन्यात WHO ने Mpox चा प्रादुर्भाव पाहता आफ्रिकेच्या अनेक भागात आणीबाणी घोषीत केली. रवांडा, युगांडा, कांगो, बुरुंडी, केनिया सारख्या इतर राष्ट्रांमधून प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तेथे 100,000 हून अधिक लोकांना मंकीपॉक्सची लागण झाली. सुमारे 220 मृत्यू झाले आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, त्यांनी बव्हेरियन नॉर्डिक (BAVA.CO) लसीला mpox विरूद्ध प्रथम डोस म्हणून मान्यता दिली आहे. एमपॉक्स विरूद्ध लसीची ही पहिली पूर्व पात्रता आफ्रिकेतील सध्याच्या उद्रेकाच्या संदर्भात आणि भविष्यातील दोन्ही रोगांविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं WHO महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी म्हटलं आहे.  ही लस 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना दोन डोसमध्ये दिली जाऊ शकते. ही लस सध्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी परवानाकृत नसली तरी ती लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वापरली जाऊ शकते जेथे लसीकरणाचे फायदे संभाव्य जोखमींपेक्षा जास्त आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now