धक्कादायक! पत्नीने स्वंयपाक घरात पूरला पतीचा मृतदेह आणि महिनाभर केलं 'हे' काम

येथील एका महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पूरला. त्यानंतर महिनाभर तिने याच जागेवर स्वयंपाकही बनवला. तिने जवळ-जवळ महिनाभर हे सत्य लपवून ठेवले.

Image used for representational purpose

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) अनुप्पूर जिल्ह्यात (Anuppur District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पूरला. त्यानंतर महिनाभर तिने याच जागेवर स्वयंपाकही बनवला. तिने जवळ-जवळ महिनाभर हे सत्य लपवून ठेवले. कारोंडी गावात राहणारे महेश बानावाल हे 22 ऑक्टोंबरपासून बेपत्ता होते. त्यानंतर महेश यांची पत्नी प्रमिलाने पोलिस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, महेश यांचा मोठ्या भावाने (अर्जुन) 21 नोव्हेंबरला पोलिसांशी संपर्क साधला. अर्जुन यांच्या संशयामुळे पोलिसांना या गुन्ह्याची उकल करणं शक्य झालं.  (हेही वाचा - मुंबई: एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या; आरोपीस अटक)

महेश यांचा तपास करण्यासाठी अर्जुन घरी गेल्यावर प्रमिलाने त्यांना घरात येण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जुन यांना प्रमिलावर संशय आला. त्याने ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी महेशच्या घरी तपासणी केली. त्यावेळी त्यांना तेथे दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. घराच्या आतून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली.

हेही वाचा - अमरावती: एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या; जमावाकडून आरोपीस चोप

पोलिसांना स्वयंपाक घरातील फरशीच्या खालून ही दुर्गंधी येत असल्याचे समजले. त्यांनी लागलीच तेथे खोदकाम केले. दरम्यान, पोलिसांना फरशी खाली खराब झालेला मृतदेह आढळला. याच फरशीवर प्रमिला महिनाभर जेवण बनवत होती. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर प्रमिलाने हा गुन्हा केला नसल्याची कबुली देत आपल्याला या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगितले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.