Bhiwani Road Accident: खासदार सुभाष बराला यांच्या कारचा अपघात, सुदैवाने थोडक्यात वाचले प्राण

शनिवारी संध्याकाळी कारचा अपघात झाला. कार एका भल्या मोठ्या झाडाला जाऊन धडकली.

Bhiwani Road Accident: हरियाणाचे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुभाष बराला (Subhash Barala) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी संध्याकाळी कारचा अपघात झाला. कार एका भल्या मोठ्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात ते जखमी झाले असून सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु केले आहे. (हेही वाचा- बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष बराला हे विधानसभा निवडणूक प्रचार संपवून हिसारला जात असताना एकाचा अपघात झाला. अपघातावेळीस कारमध्ये सुभाष, कार चालक आणि कार्यकर्ता उपस्थित होते. शनिवारी संध्याकाळी कार शेरापूरा गावातून जाताना अपघात झाला. कार अचानक अनियंत्रित झाली आणि थेट झाडाला धडकली. या अपघातात त्यांच्या कारचे भरपूर नुकसान झाले.

अपघातामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. या अपघातातून सुभाष थोडक्यात वाचले. सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेच. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.