Punjab Shocker: आईच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने हल्ला, पायाचे केले तुकडे, पंजाब येथील खळबळजनक घटना

पंजाब शहरातील अबोहर मुलाने आईच्या प्रियकराला मारहाण केली आहे. पीडितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करत पायाचे तुकडे केले आहे. हाताला आणि पायाला गंभीर दुखपत झाली आहे.

Punjab SHocker: PC TW

Punjab Shocker: पंजाब शहरातील अबोहर एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुण मुलाने आईच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आहे. नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर मुलाला राग अनावर झाला आहे. त्याने पीडितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करत पायाचे तुकडे केले. हाताला आणि पायाला गंभीर दुखपत झाली आहे. एवढंच नाही तर त्याचाय प्राईव्हेट पार्ट कापला आहे. स्वरंग सिंग असे पीडितेचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल रेफर केले आहे. (हेही वाचा- सिलचरमध्ये आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला दारू पाजली, सिगारेट ओढण्यास भाग पाडले; तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने रात्रीच्या वेळीस आई आणि तिच्या प्रियकराला सोबत असताना पाहिले. हे पाहताच मुलाला राग अनावर झाला. मुलाने कुऱ्हाड उचलली आणि नग्न अवस्थेत असलेल्या आईच्या प्रियकरावर हल्ला केला. तेवढ्यात आई घटनास्थळावरून फरार झाली. हल्यात आरोपीने पीडितेच्या पायांवर वार केला. एका पायाचे तुकडे केले. दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि हाताला देखील गंभीर जखम झाली. एवढेत नाही तर आरोपीने पीडितेच्या प्राईव्हेट पार्टवर हल्ला केला.

या घटनेनंतर तो गंभीर जखमी झाला. आरोपीने दोन तासानंतर पोलिसांना घटनेची माहिती फोन करून दिली. घटनास्थळी दाखल होताच, पीडितेला रुग्णालयात दाखल केले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement