Kerala Murder Case: केरळमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या मुलांची गळा दाबून हत्या, घटनेनंतर आईचाही आत्महत्येचा प्रयत्न

केरळमधील (Kerala) पलक्कड (Palakkad) जिल्ह्यातील शोरानूर (Shoranur) येथील मंजाकड (Manjakad) येथे रविवारी सकाळी एका आईने आपल्या दोन लहान मुलांची हत्या (Murder) केली आहे. त्यानंतर तिनेही आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला.

Kerala Murder Case: केरळमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या मुलांची गळा दाबून हत्या, घटनेनंतर आईचाही आत्महत्येचा प्रयत्न
Murder | (Photo Credits: PixaBay)

केरळमधील (Kerala) पलक्कड (Palakkad) जिल्ह्यातील शोरानूर (Shoranur) येथील मंजाकड (Manjakad) येथे रविवारी सकाळी एका आईने आपल्या दोन लहान मुलांची हत्या (Murder) केली आहे. त्यानंतर तिनेही आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मांजकड, शोरानूर येथील परियांकंदथ घरातील दिव्या असे आईचे नाव आहे. चार वर्षांचा अनिरुद्ध आणि एक वर्षाचा अभिनव यांचा मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या दोन मुलांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. आईने एका खोलीत नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  आवाज ऐकून पती विनोद व इतरांनी दरवाजा तोडला असता मुलेही बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले असले तरी मुलांना वाचवता आले नाही.

त्यानंतर दिव्याच्या पतीची आजी, अम्मिनी अम्मा यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न हे कुटुंबातील वादाचे परिणाम होते, असे पोलिसांनी सांगितले. शोरनूर पोलिसांनी घरी येऊन दिव्याचा पती विनोद याचे जबाब घेतले. हेही वाचा Madhya Pradesh: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, पीडितेवर आरोपीकडून दोन वर्ष बलात्कार

शोरनूर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या इच्छेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, घरातील भांडणानंतर आई नैराश्यात होती.  त्यातून तिने मुलांची हत्या केली आहे. जर एखादी महिला एवढी टोकाची भूमिका घेत असेल तर हे दुर्देव आहे. तिने 4 आणि 1 वर्षाच्या मुलांची हत्या केली. याचा अर्थ ती मानसिक दडपणाखाली होती किंवा तिला काही घरगुती समस्या सहन होत नाहीत. पोलिस सर्व पैलूंचा तपास करत आहेत, ज्यामध्ये तिच्या पतीच्या आजीने देखील रक्तवाहिनी कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2021 07:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).