Uttar Pradesh Shocker: शाळेत जाण्यास नकार दिल्याने आईने मुलीला फटकारले; 13 वर्षीय मुलीची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
यामुळे संतापलेल्या तिच्या आईने मुलीला शाळेत जाण्याचा हट्ट धरल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली.
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा (Mathura) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका किशोरवयीन मुलीला शाळा सोडल्याबद्दल तिच्या आईने फटकारल्यामुळे मुलीने चालत्या ट्रेनसमोर (Moving Train) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुशी शर्मा असं या मुलीच नाव होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय खुशी शर्मा बुधवारी शाळेत जाण्यास तयार नव्हती. यामुळे संतापलेल्या तिच्या आईने मुलीला शाळेत जाण्याचा हट्ट धरल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यानंतर खुशीने शाळेत जाण्याऐवजी अलवर-मथुरा रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेचे साक्षीदार असलेल्या स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. (हेही वाचा -Varanasi Mass Suicide: एकाच कुटुंबातील ४ जणांनी गळफास लावून केली आत्महत्या, वाराणसीतील घटना)
खुशीचे वडील रामवीर यांनी इंडिया टुडेला सांगितले की, तिचा भाऊ बारावीच्या वर्गात शिकत आहे. तसेच तिची धाकटी बहीण 8 वीच्या वर्गात शिकत आहे. असं म्हटलं जात आहे की, आईच्या वारंवार टोमण्यांमुळे मुलगी नाराज होती. (वाचा - Kerala Doctor Dies By Suicide: हुंड्यात मागितली BMW कार आणि 15 एकर जमीन; लग्न मोडल्याने केरळच्या महिला डॉक्टरची आत्महत्या)
गेल्या महिन्यात, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान एका वेटरला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली तेव्हा पीडित पंकज हा अंकुर विहार येथील सीजीएस वाटिका येथे वेटर म्हणून काम करत होता.
ऋषभ आणि त्याच्या मित्रांसोबत झालेल्या भांडणात पंकज जमिनीवर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. पकडले जाण्याच्या भीतीने ऋषभ आणि त्याच्या मित्रांनी मृतदेह जवळच्या जंगलात लपवून ठेवला. 18 नोव्हेंबरला घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तिन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.