IPL Auction 2025 Live

Puducherry Shocking! मुलीचा वर्गमित्र पहिला यायचा म्हणून आईने केली हत्या; काय आहे नेमके प्रकरण? वाचा

मुलगा नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये अव्वल येत होता. त्यामुळे तिची मुलगी मागे राहते, याचा राग मनात ठेऊन या महिलेने मुलाचा खून केला.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Puducherry Shocking: सध्या सर्वच ठिकाणी स्पर्धा आहे. शाळांमध्ये मुलांमध्येही स्पर्धा पाहायला मिळते. मुलांना चांगले गुण मिळावेत यासाठी पालक नेहमी लक्ष देत असतात. पण स्पर्धेचे एक भयानक प्रकरण पुद्दुचेरी (Puducherry) मध्ये समोर आले आहे, जिथे एका विद्यार्थिनीच्या आईने मुलीच्या वर्गमित्राला विष देऊन ठार केले. मुलगा नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये अव्वल येत होता. त्यामुळे तिची मुलगी मागे राहते, याचा राग मनात ठेऊन या महिलेने मुलाचा खून केला.

प्राप्त माहितीनुसार, महिलेची मुलगी आणि तिचा वर्गमित्र हे दोघे आठवीत शिकत होते. शुक्रवारी ही महिला मुलांच्या शाळेत गेली होती. तिने शाळेतील वॉचमनला ती मणिकंदनची आई असल्याचे सांगितले. महिलेने शीतपेयांच्या दोन बाटल्या चौकीदाराला दिल्या आणि माझ्या मुलाला द्या, असे सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर चौकीदाराने त्या बाटल्या मणिकंदनला दिल्या. (हेही वाचा - Fraud Case In Nagpur: वीज बिलाच्या बनावट मेसेजच्या लिंकवर क्लिक करताच खात्यातून कट झाले 1 लाख 68 हजार रुपये)

हे पेय आईने पाठवले आहे, असे समजून मणिकंदन ते पेय प्याला. मात्र घरी पोहोचल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्या. यानंतर मुलाच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेले आणि उपचारानंतर त्याला घरी नेण्यात आले. मात्र शनिवारी तो पुन्हा आजारी पडला आणि रात्री त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी मणिकंदनने आईला सांगितले की, तिने चौकीदाराला दिलेले शीतपेय प्यायले. यावर आईला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्यानंतर मणिकंदनच्या आईने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. (हेही वाचा -

मणिकंदनच्या आईने कराईकल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एसएसपी लोकेश्वरन यांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली आणि शनिवारी रात्री तिला अटक केली. चौकशीत महिलेने सांगितले की, तिने शीतपेयात अतिसाराचे औषध मिसळल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून स्थानिक न्यायालयाने महिलेची कारागृहात रवानगी केली आहे.