IndiGo Flights Cancelled as Microsoft Outage: मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे एअरलाइन्स ऑपरेशन्सवर परिणाम झाल्यामुळे इंडिगोच्या 200 हून अधिक उड्डाणे रद्द
गोव्यातील दोन विमानतळांवरून इंडिगोच्या पाच उड्डाणे शुक्रवारी रद्द करण्यात आली, तर मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक उड्डाणे उशीर झाली.
IndiGo Flights Cancelled as Microsoft Outage: मायक्रोसॉफ्ट ऍप्लिकेशन्सच्या जागतिक आउटेज (Microsoft Outage) मुळे भारत आणि परदेशातील हवाई सेवांवर परिणाम झाल्यामुळे बजेट वाहक इंडिगोला (IndiGo Flights) शुक्रवारी देशभरातील तब्बल 200 उड्डाणे रद्द करावी लागली. जगभरातील ट्रॅव्हल सिस्टम आउटेजच्या कॅस्केडिंग परिणामामुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही तुमच्या संयमाची आणि समर्थनाची खरोखर प्रशंसा करतो, असं इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनीने असेही म्हटले आहे की, फ्लाइटचे रीबूक करणे किंवा परताव्यावर दावा करण्याचा पर्याय तात्पुरता अनुपलब्ध आहे. गोव्यातील दोन विमानतळांवरून इंडिगोच्या पाच उड्डाणे शुक्रवारी रद्द करण्यात आली, तर मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक उड्डाणे उशीर झाली. (हेही वाचा -Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन; शेअर बाजार, बँकिंगसह बंद झाल्या 'या' सेवा)
तथापी, इतर अनेक एअरलाइन्सनी जागतिक आउटेजनंतर सल्लागार जारी केले आणि प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचे आवाहन केले. ऑटोमॅटिक सिस्टीम डाऊन असल्याने एअरलाइन्सना मॅन्युअली बोर्डिंग पास द्यावे लागत असल्याने अनेक फ्लाइट्स उशिराने सुरू होत्या. (हेही वाचा - Microsoft Windows Crash News: जगभरात अनेक युजर्सच्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वर ‘Your Device Ran Into a Problem’ चे मेसेजेस; अनेकांनी X वर शेअर केले स्क्रिनशॉर्ट्स)
दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, त्यांचे मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) सक्रियपणे परिस्थितीचे व्यवस्थापन करत आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने AAI च्या सहकार्याने ऑपरेशनल सातत्य राखण्यासाठी मॅन्युअल बॅकअप प्रणाली लागू केली आहे, असे नायडू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.