माकडाने नवजात मुलाला पळवले आणि फेकले, बालकाचा मृत्यू

नवजात शिशूला दूध पाजणाऱ्या आईच्या हातून माकडाने चक्क बाळालाच पळवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो सौजन्य - Unsplash
उत्तर प्रदेशात माकडांनी तेथील लोकांवर हल्ला केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या हातातील वस्तू घेऊन पळ काढणे हे माकडांनी बरोबर ठरविले आहे.मात्र एका नवजात शिशूला दूध पाजणाऱ्या आईच्या हातून माकडाने चक्क बाळालाच पळवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आग्रा येथील रुनकता मधील एका कॉलीनीमध्ये एक महिला आपल्या नवजात शिशूला दूध पाजण्यासाठी बसली होती. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असताना एका माकडाने चक्क घरात घुसुन महिलेच्या हातातील शिशूला घेऊन पळाला. या घटनेने पीडित महिलेने त्या माकडाचा पाठलाग केला. अखेर आजूबाजूच्या मंडळींच्या आवाजाने घाबरुन त्या माकडाने नवजात शिशूला तेथून फेकून पळ काढला.
या घटनेने नवजात मुलगा गंभीर जखमी झाला. परंतु उपाचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला म़त घोषित केले. त्यामुळे या पीडित महिलेच्या घरातील मंडळींना मोठा धक्काच बसला आहे.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif