#MeToo एम. जे अकबर यांची प्रिया रमानीविरुद्ध न्यायलयात धाव

जे. अकबर हे त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

#MeToo: केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

देशभरात लैंगिक शोषण झालेल्या महिला #MeToo चा आधार घेत आपल्या सोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळेच आता तनुश्री दत्ता नंतर अनेक सिनेसृष्टीतील कलाकार या मी टू च्या मोहिमेत सामील झाले आहेत. तर पत्रकार प्रिया रमानी हिने केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता एम. जे. अकबर हे त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रिया रमानी हिने काही दिवसांपूर्वी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अन्य 12 पत्रकारांनीसुद्धा त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तर या घटनेमुळे विरोधी पक्षाकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु राजीनाम्याच्या दाव्यावर अकबर यांनी मौन बाळगले होते. तसेच आपल्यावर आरोप लावलेल्या महिलांच्या विरोधात कारवाई करावी असेही अकबर यांनी सांगितले होते. त्यानुसार आता अकबर यांनी प्रिया रमानी विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

रमानी यांनी केलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण देत अकबर म्हणले की, 'प्रिया हिने काही वर्षांपूर्वी एक लेख लिहून याची सुरुवात केली होती. मात्र त्या लेखात माझे नाव का घेतले नाही?' असा प्रश्न अकबर यांनी केला आहे. तर जी घटना सत्य नाही त्याचा उल्लेख रमानी यांनी केला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असे स्पष्टपणे अकबर यांनी सांगितले आहे.