चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
दिल्लीमध्ये चार वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादाक घडना घडली आहे.
दिल्लीमध्ये चार वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादाक घडना घडली आहे. तर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्ली येथील नरेला येथे राहणाऱ्या चार वर्षीय मुलीच्या घरी रविवारी घरी कोणीही नव्हते. तसेच या मुलीचे वडील एका फॅक्टरीमध्ये काम करतात. तर आई काही कामासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने तिच्या घरात घुसुन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या घरातील मंडळींना सांगितला. तेव्हा तातडीने पोलीस स्थानक गाठून मुलीच्या घरातील मंडळींनी अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तर आरोपीवर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.