माजी दिव्यांग सैनिकांना मिळणार 18 हजार रूपये पेंशन; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी

केंद्र सरकारकडून काल जारी करण्यात करण्यात आलेल्या पत्रकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

Nirmala Sitharaman (Photo Credit: PTI/File)

दरवर्षीप्रमाणे यंदाचाही प्रजासत्ताकदिन खास ठरला. या दिनाचे औचित्य साधून माजी दिव्यांग सैनिकांसाठी सरकारने फार मोठी घोषणा केली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक सैनिक आपल्या प्राणांची आहुती देतात, तसेच अनेकजणांना आपल्या शरीराचा एखादा अवयव गमवावा लागतो. तर अशा माजी दिव्यांग सैनिकांसाठी सरकारने 18,000 पेन्शन सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून काल जारी करण्यात करण्यात आलेल्या पत्रकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. या निर्णयामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सैनिकांच्या पेन्शनबाबत सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे.  (हेही वाचा : पीएफ आणि पेंशन धारकांना झटका; बुडू शकते तुमच्या खात्यातील रक्कम)

ही पेंशन 1 जानेवारी 2016 पासून देण्यात येणार आहे. याबाबत संरक्षण खात्याने निर्णय दिला आहे.  यापूर्वी 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, सैनिकांची ही पेन्शन टप्प्या टप्प्याने देणार होती. पेंशन संदर्भात सातव्या वेतन आयोगात स्लॅब-बेस्ट प्रणालीचा वापर करण्यात यावा अशा सुचना करण्यात आल्या होत्या. मात्र याबाबत सैनिक नाराज होते, त्यांनी मोदी सरकारवर टीका करत हे प्रकरण अनॉमली समितीपर्यंत नेले होते. शेवटी आज केंद्र सरकार आणि संरक्षण खात्याने पेंशनच्या निर्णयाला मंजुरी देत 18,000 पेंशन निश्चित केली आहे.