Indian Railway Kavach Technique: रेल्वेच्या इंजिनमध्ये बसले होते रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw; 'कवच'ने रोखली समोरून येणाऱ्या रेल्वेची टक्कर, Watch Video
आज दोन रेल्वे गाड्या समोरासमोर चालवण्यात आल्या. त्यात एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
Indian Railway Kavach Technique: भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. रेल्वेने कवच तंत्राची (Kavach Technique) यशस्वी चाचणी केली. आज दोन रेल्वे गाड्या समोरासमोर चालवण्यात आल्या. त्यात एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह इतर अधिकारी उपस्थित होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या चाचणीचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ज्या ट्रेनमध्ये चढले होते ती समोरून येणाऱ्या ट्रेनच्या 380 मीटर आधी थांबली. कवच तंत्रज्ञानामुळे ट्रेनमध्ये आपोआप ब्रेक लागू झाले. रेल्वेमंत्र्यांनी एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रेल्वेमंत्री आणि इतर अधिकारी लोकोपायलटच्या केबिनमध्ये दिसत आहेत. (वाचा - MSRTC Strike: एसटी महामंडळ महाराष्ट्र सरकारच्या सेवेत विलीन करता येणार नाही, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात निष्कर्श)
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, “रीअर-एंड टक्कर चाचणी यशस्वी. कवचने आपोआप लोकोला इतर लोकोच्या 380 मीटर पुढे थांबवले."भारतीय रेल्वे सतत कवच तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्या अंतर्गत भविष्यात शून्य अपघाताचे लक्ष्य साध्य केलं जाईल. याअंतर्गत शुक्रवारी रेल्वे टक्कर संरक्षण प्रणाली कवचची चाचणी घेण्यात आली.
काय आहे कवच तंत्रज्ञान? जाणून घ्या
ट्रेनच्या टक्कर संरक्षण प्रणालीमध्ये, दोन गाड्या विरुद्ध दिशेने एकमेकांच्या जवळ येत असल्यास, त्यांचा वेग कितीही असो, या दोन गाड्या 'कवच'मुळे टक्कर होणार नाहीत. हे तंत्रज्ञान ओव्हर स्पीडिंग टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंगसाठी आहे. त्याचवेळी ट्रेन फाटकाजवळ पोहोचली की आपोआप शिटी वाजते. या कवच तंत्रज्ञानामुळे दोन इंजिनमध्ये टक्कर होणार नाही. तसेच, आणीबाणीच्या परिस्थितीत SOS संदेश पाठवेल. यात नेटवर्क मॉनिटर सिस्टमद्वारे ट्रेनची हालचाल देखील समाविष्ट आहे.