Amritsar Fire News: अमृतसरमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
अमृतसरमध्ये (Amritsar) एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Amritsar Fire News: अमृतसरमध्ये (Amritsar) एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील मजिठा रोडवर असलेल्या क्वालिटी फार्मास्युटिकल फॅक्टरीला आग लागली. आगीची माहिती मिळताच कर्माचाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरु केले. कर्मचारी जीव वाचवून पळून बाहेर आले परंतु या आगीत तीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शार्ट सर्कीट झाल्यामुळे भीषण आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. भीषण आग लागल्यामुळे फॅक्टीरीतील सर्व वस्तू जळून खाक झाले आहे. कुलविंदर सिंग, राणी, सुखजित सिंग आणि गुरभेज सिंग असं या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांची नावे आहे. काही कर्मचारी काम संपल्या मुळे घरी जात होते तेवढ्यात भीषण आग लागली.
आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच संपुर्ण फॅक्टरी जळली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच प्रयत्नाने आग आटोक्यात आली. बचावकार्याचे काम सुरु असताना त्यांना आगीत तीन मृतदेह सापडले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

