Captain Anshuman Singh Parents Alleged: शहिद अशुमन शिंग यांचं कीर्तीचक्र घेऊन पत्नी गेली माहेरी, सासरच्या मंडळीकडून आरोप

गेल्या वर्षी जुलैमध्ये सियाचीन येथे सहकार्यांना वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंग यांना वीरमरण आले. काही दिवसांपूर्वीच अंशुमन सिंग यांच्या कुटुंबियांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्र देण्यात आले.

captain anshuman singh parents alleged PC TW

Captain Anshuman Singh Parents Alleged: गेल्या वर्षी जुलैमध्ये सियाचीन येथे सहकार्यांना वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंग यांना वीरमरण आले. काही दिवसांपूर्वीच अंशुमन सिंग यांच्या हौतात्म्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्र देण्यात आले. कीर्ती चक्र दिल्यानंतर अंशुमन सिंग यांच्या पत्नी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु अंशुमन सिंग यांच्या आई वडिलांनी सूनेवर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, सुनेने त्यांचे घर सोडले आणि तिचा पत्ता बदलला आहे. (हेही वाचा- शहीद अंशुमन सिंग यांच्या आईला आवडली नाही अग्निवीर योजना; म्हणाल्या- 'सरकारने राहुल गांधींचे भाषण ऐकावे' (Watch Video)

शहिद अंशुमन यांच्या आई वडिलांनी माध्यमांना सांगितले की, अंशुमनची पत्नी स्मृती ही पतीच्या फोटोंचा अल्बम, कपडे आणि कीर्ती चक्र घेऊन माहेरी गुरदासपूर येथे निघून गेल्या. इतकेच नाही तर कागदपत्रांवरील स्थानिक रहिवासी म्हणून असणारा पत्ताही बदलून गुरदारपूर केला आहे. अंशुमन सिंगच्या पालकांनी मंगळवारी कॉग्रेस नेते राहूल गांधी यांची भेट घेऊन त्यांना या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली.

या घटनेनंतर स्मृती यांनी कोणतेही विधान दिले नाही. माध्यमांशी संवाद साधताना अंशुमन यांच्या वडिलांनी सांगितले की, अंशुमन यांचे इच्छेनुसार, स्मृतीसोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर स्मृती बीडीएसचा अभ्यास करत होती. स्मृतीच्या वडिलांनी तिच्या आयुष्यसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळीस अंशुमन यांच्या वडिलांनी सांगितले की, स्मृती ही आमची सून नसून मुलगी आहे. तीच्या इच्छेनुसार दुसर लग्न लावू. परंतु तेरावं झाल्यानंतर स्मृती घर सोडून माहेरी गेली होती. तीनं अंशुमनचा कायमाचा पत्ता देखील बदला. त्यामुळे आमच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement