महिलाच नाही तर आता जनावरेही असुरक्षित; बकरीशी केले विकृत चाळे
एका मनुष्याने आपली हवस पूर्ण करण्यासाठी चक्क एका बकरीलाच आपली शिकार बनवली आहे
सध्याच्या काळात मनुष्याला जनावर जरी म्हटले तरी त्या जनावराचा अपमान होईल अशी परिस्थिती आहे. एखाद्या मानवाची विचार शक्ती खुंटून इतक्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकते हे फार मोठे कोडे आहे. समाजात जिथे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उठत आहेत तिथेच आता जनावरांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे जिथे एका मनुष्याने आपली हवस पूर्ण करण्यासाठी चक्क एका बकरीलाच आपली शिकार बनवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या मौदहा गावातील, तकिया गल्लीमध्ये असलेल्या पशुशाळेमध्ये रात्री एक तरुण घुसला. स्वतःमधील वासना शांत करण्यासाठी त्याने एका बकरीला आपला बळी बनवले. जेव्हा बकरीसोबत त्याचे हे विकृत चाळे चालले होते, तेव्हा बकरीच्या आवाजाने तिच्या मालकाला जाग आली. त्यानंतर आसपासचे इतरही लोक जमा झाले, आणि या तरुणाच्या विकृत कृत्याबद्दल समजले. त्याचवेळी हा तरुण भिंतीवरून उडी मारून पळून गेला. लोकांनी याचा पाठलाग केला मात्र तो हाती लागला नाही. आता पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
उत्तरप्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यात ही गोष्ट घडली आहे. या बकरीच्या मालकाने पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतला आहे. समाजातील ही विकृती पाहून या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.