UP Shocker! उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात 60 वर्षीय व्यक्तीने हातोड्याने वार करून पत्नी आणि दोन मुलींची केली हत्या; एका मुलीची प्रकृती गंभीर

या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला.

बुलंदशहरात 60 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलीची हत्या केली(PC- ANI)

UP Shocker! उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलींवर हातोड्याने (Hammer) हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर ग्रामीण भागातील माजरा आंबेडकर नगरची आहे.

या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एसएसपी संतोषकुमार सिंग यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की, मंगळवारी रात्री एका 60 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींवर हातोडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तसेच एका मुलीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वाचा - Online Frauds: धक्कादायक! ऑनलाइन पिझ्झा मागविला अन् अकाऊंटमधील 4 लाख रुपये झाले गायब)

या घटनेच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी सांगितले की, आरोपी घटनेनंतर पळून गेला. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पत्नी व मुलींच्या चारित्र्यावर शंका आल्याने या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं प्राथमिक चौकशीत सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.