महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा द्यावा - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Rahul Gandhi (PC - Twitter)

महाराष्ट्र (Maharashtra) हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा द्यावा, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांना एका पत्रकाराने करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला केंद्राने अधिक मदत करायला हवी का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र हे एक मोठं राज्य असून ते अद्वितीय आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राचा पूर्ण पाठींबा मिळायला हवा. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, असं मतही राहुल गांधी यांनी यावेळी मांडलं. (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या पॅकेज बाबत पुनर्विचार करावा- राहुल गांधी)

केंद्र सरकारने महाराष्ट्रचं नव्हे तर सर्वच राज्यांना मदत करायला हवी. राज्य सरकारच्या माध्यमातूनच कोरोना विरोधातील लढाई लढणे अधिक सोयीस्कर होईल. राज्य सरकार या लढाईचे नेतृत्व करु शकतात. व्यवस्थापन पाहणे हे केंद्र सरकारचे काम आहे. तर केंद्राने आखलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याचे आणि त्यांची अंमलबाजवणी करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif