School Curriculum : अकबर-सिकंदरला बाजूला करत आता, शालेय अभ्यासक्रमात महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा दिसणार

कारण, आता विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात अकबर-सिकंदर या भारताबाहेरील पराक्रमी पुरूषांच्या कथा नाही तर, भारतीय पराक्रमी पुरूष महाराणा प्रताप, चंद्रगुप्त यांच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

School Curriculum : देशभरात शालेय अभ्यासक्रम बदलाच्या मार्गावर आहे. लवकरच शालेय आभ्यास क्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात (History Book) अकबरचे-सिकंदरचे कारनामे (Akbar-Sikandar) शिकवले जात होते. त्यात आता चंद्रगुप्त मौर्य (Chandragupta) आणि महाराणा प्रताप (Maharana Paratap) यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जाणार आहेत. इतिहासाच्या पुस्तकात बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात लवकरच इतिहासाच्या पुस्तकात बदल केले जाणार आहेत. मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी नव्या बदलाची घोषणा केली आहे.  (हेही वाचा:India's first AI teacher: केरळमधील शाळेने लॉन्च केली भारतातील पहिली एआय शिक्षक 'आयरिस' (Watch Video) )

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही इतिहासाच्या पुस्तकात बदल केले जाणार असल्याचं सांगितलं होतं. आपला इतिहास केवळ मुघलांशी संबंधित नाही. तर त्यात अनेक तथ्ये आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. म्हणून, आपण मुलांनाही त्याबद्दल शिकवणं गरजेचं आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं होतं. त्याच धर्तीवर आता मध्यप्रदेशमध्ये शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना खासदार आणि शिक्षणमंत्री इंदरसिंग परमार यांनी शाळा-महाविद्यालयांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून अकबर-सिकंदर यांची नावे काढून महाराणा प्रताप, चंद्र गुप्ता आणि विक्रमादित्य यांच्याविषयी माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं.(हेही वाचा:Free Education for Girls in Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण; मेडिकल, इंजिनिअरिंग 600 अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश )

ब्रिटीश राजवटीत इंग्रजांनी आपल्या देशातील 7 लाख शाळा-महाविद्यालये बंद केली होती. आपल्या पूर्वजांना अशिक्षित म्हणत अपमानित करण्यात आले होते. इतिहासाच्या पानांवर आपल्या पूर्वजांचं वर्णन दरोडेखोर आणि गुन्हेगार म्हणून करण्यात आलं होते, चुकीचा इतिहास शिकवला गेला होता. त्यामुळे आता बदल महत्त्वाचं असल्याचं इंदर सिंह परमान यांनी म्हटलं.