Madhya Pradesh: गावकऱ्यांनी आजारी बिबट्याचा केला बछड्याप्रमाणे संभाळ, इंदौर मध्ये उपचार सुरु

त्यांच्यावर इंदौर येथे उपचार सुरु असल्याची समजले आहे.

Leopard - pc ANI

Madya Pradesh: मध्य प्रदेशातील एका आजारी बिबट्याला देवास जिल्ह्यातून इंदूर प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी आणल्यानंतर, डॉ उत्तम यादव (प्रभारी, कमला नेहरू प्राणी संग्रहालय) म्हणतात, “सकाळी 10 च्या सुमारास देवास वनपरिक्षेत्रातून आणण्यात आले आणि आम्ही उपचार सुरु केले. सकाळी 11 वाजता उपचार करण्यास सुरुवात केली. तपासणीत न्यूरोलॉजिकल हे प्राथमिक लक्षणे असल्याचे दिसून आले. याची अनेक कारणे असू शकतात. गावकरी या बिबट्याला बछड्याप्रमाणे सांभाळत होते. हे अतिशय आश्चर्यकारक होते. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात प्राणी आपली ओळख विसरतात. बिबट्याची प्रकृती चिंताजनक आहे. जबलपूरची वन्यजीव फॉरेन्सिक लॅब नमुने घेण्यासाठी येत आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील काही गोष्टी सांगता येईल...''