Madhya Pradesh News: 45 वर्षीय व्यक्तीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, पोलिस चौकशी सुरु
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे क्षिप्रा येथे एका ४५ वर्षीय व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील भोपाळ येथे क्षिप्रा येथे एका 45 वर्षीय व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. ही घटना क्षिप्रा पोलिस स्टेशन हद्दीतील मांगलिया जून्या पोलिस किऑस्कजवळ घडली. मृताचे हात पाय बांधलेले होते आणि तोंडाचा अर्धा भाग रुमालाने झाकलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आला आहे. मात्र, त्याने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत कुटुंबीयांचे जबाब नोंदवत आहेत. (हेही वाचा-दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरावर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यादव असे मृताचे नाव आहे, तो आदर्श मेघदूत नगर येथील रहिवासी आहे. मृताचा भाऊ जगदीश याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता पीडितेचे बूट आणि चष्मा सापडला. सतीश हा झाडाला लटकलेला होता आणि त्याचे हात पाय बांधलेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस या प्रकरणी कुटुंबाकडून चौकशी करत आहे.पुढील तपासणी सुरु केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल सांगितला की, फाशीमुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे.गावात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घरगुती कारणांमुळे आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2024 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

