Madhya Pradesh: हिंदूंना हिंदू म्हणून राहायचे असेल तर भारताला 'अखंड' बनवायला हवं - सरसंघचालक मोहन भागवत
ते म्हणाले की भारत हिंदुस्थान आहे आणि हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 'अखंड भारत'ची गरज असल्याचे सांगितले तसेच भारत (India) हिंदुस्थान आहे आणि हिंदूंना हिंदूच राहायचे असेल तर भारताला 'अखंड' बनवावे लागेल, असे वक्तव्य त्यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेर जिल्ह्यात एका कार्यक्रमात संबोधित करताना केले. आजकाल हिंदूंची संख्या आणि ताकद कमी झाल्याचे किंवा हिंदुत्वाची भावना कमी झाल्याचे दिसून आले आहे. ते म्हणाले की भारत हिंदुस्थान आहे आणि हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. खरं तर, 4 दिवसीय 'घोष शिविर'ला संबोधित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी (RSS) प्रमुख 26 नोव्हेंबरला ग्वाल्हेरला पोहोचले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, "हिंदुस्थान" हे हिंदू राष्ट्र आहे ज्याचे मूळ हिंदुत्व आहे आणि हिंदू आणि भारत अविभाज्य आहेत. हिंदूंना हिंदूच राहायचे असेल तर भारत 'अखंड' झाला पाहिजे.
Tweet
इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा हिंदू आपली ओळख विसरतात तेव्हा देश संकटात सापडतो आणि तो तुटतो पण आता हिंदूंचे पुनरागमन होत आहे. यासोबतच जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. आज जग भारताकडे पाहत आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे. भारताला भारतच राहायचा असेल तर हिंदूच राहिले पाहिजे आणि हिंदूंना हिंदूच राहायचे असेल तर भारत अखंड झाला पाहिजे, असे ते म्हणाले. हा हिंदुस्थान आहे जिथे हिंदू राहतात आणि त्यांच्या परंपरांचे पालन करतात. या भूमीत जो हिंदू म्हणतो तो विकसित होतो. (हे ही वाचा Mann Ki Baat Live Streaming: 'मन की बात' पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी साधणार संवाद; कृषी कायदे, संसद अधिवेशन, कोरोना व्हायरस मुद्द्यांवर भाष्य, इथे पाहा थेट भाषण.)
सरसंघचालक म्हणतात की, हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. "भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली कारण आपण हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे झालं. तेथील मुस्लीमदेखील हे विसरले होते. आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारत राहिला नाही”
कृष्णानंद सागर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सरसंघचालक म्हणाले होते की, भारताची विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. स्वतःला योग्य आणि इतरांना चुकीचे समजणारी ही विचारधारा नाही. सध्या इस्लामी आक्रमकांची विचारसरणी इतरांना चुकीची आणि स्वत:ला बरोबर मानणारी होती. यासोबतच इंग्रजांची विचारसरणीही अशीच होती. पूर्वी संघर्षाचे हेच मुख्य कारण होते. 1857 च्या क्रांतीनंतर आक्रमकांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विघटन घडवून आणले. हा 2021 चा भारत आहे, 1947 चा नाही. एकदा फाळणी झाली की पुन्हा होणार नाही.