Lucknow Crime: लग्नाआधीच्या कार्यक्रमात गोळीबार, घटनेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना
या गोळीबार घटनेत एका तरुणाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला आहे
Lucknow Crime: लखनऊमध्ये (Lucknow) एका लग्नाआधीच्या कार्यक्रमात भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबार घटनेत एका तरुणाला गोळी लागून त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. सोमवारी ही घटना लखनऊ येथील पेपरमिल कॉलनीत घडली. आयुष खरे असं मृत तरुणाचे नाव आहे. गोळी लागताच त्याला स्थानुक रुग्णालयात दाखल करण्यात आहे होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. नुकतच त्याचं शिक्षण पूर्ण झाले होते. आयुष हा त्याचा मित्र गौतम सोनकर याच्या घरी आला होता. गौतमच्या घरी त्याच्या बहिणीचे लग्न होते त्यासाठी त्याला कार्यक्रमासाठी आमंत्रिक केले होते. शुक्रवारी त्याच्या बहिणीचे लग्न होते. या घटनेची माहिती मिळताच, आई वडिलांनी आरोपीला कडक कारवाईची मागणी केली आहे.
पहाटे अडीचच्या सुमारास कैसरबाग मंडईतील तुषार नावाचा तरुण मद्यधुंद अवस्थेत कार्यक्रमस्थळी पोहोचला. तुषारकडे असलेल्या बंदुकीतून त्याने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर एक गोळी अचानक आयुषच्या छातीत एक गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कैसरबागचे एसएचओ रामेंद्र तिवारी या घटनेची चौकशी करत आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.