Loksabha Elections 2019 Results: अमेठी मध्ये काँग्रेसला मोठा धक्का, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बाजूने प्राथमिक कल
काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अमेठीमध्ये स्मृती इराणी यांची दमदार आघाडी प्राथमिक कलांमध्ये दिसून येत आहे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुरवाती पासूनच मतांच्या शर्यतीत मागे पडले आहेत.
अमेठी: काँग्रेस (Congress)सोबत संपूर्ण गांधी परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठीत (Amethi) आजच्या मतमोजणीत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पिछाडीवरच पाहायला मिळत आहेत त्यामुळे यंदा उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुक 2019 साठी आज देशभरात मतमोजणी सुरु असून तूर्तास प्राथमिक कल हाती आले असून यानंतर काहीच वेळात संपूर्ण निकाल समोर येणार आहेत. भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आश्चर्यकारकरित्या अमेठी मध्ये आघाडी मिळवली आहे 2014च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती यांचा राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतच मोठा पराभव झाला होता मात्र यंदा हे चित्र पूर्णपणे पालटताण दिसत आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स
उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ पासून साधारण 130 किमी अंतरावर 2004 पासून अमेठी मतदारसंघ हा काँग्रेससाठी महत्वाचं आणि हातातला विजय सिद्ध झाला होता. 2014 मध्ये तब्बल 1 लाख मतांनी स्मृती इराणी यांचा पराभव करून राहुल गांधींनी खासदारकी मिळवली होती मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीची तयारी भाजपच्या इराणी यांच्याकडून तात्काळ सुरु करण्यात आली, ज्यासाठी त्या सातत्याने या मतदारसंघात भेट देऊन विविध केंद्रीय योजनांची अंमलबजावणी तपासून पाहत होत्या. मात्र याउलट राहुल गांधी अमेठी मतदारसंघाला गृहीत धरून प्रचाराच्या दृष्टीने कमी मेहनत घेत आहेत असा आरोप देखील भाजपा कडून करण्यात आला होता. कदाचित याचाच परिणाम म्ह्णून आज निवडणूक निकालाचा कल हा भाजपच्या पारड्यात अधिक दिसत असून राहुल गांधींचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Lok Sabha Elections 2019: भाजप पक्षातील 'या' 5 महत्वाच्या नेत्यांबद्दल जाणून घ्या
दरम्यान राहुल गांधी वायनाड मधून मात्र आघाडीवर दिसून येत आहेत . प्राथमिक कलानुसारभारतीय जनता पक्षाची 'अब की बार ३०० पार' ची घोषणा खरी होण्याची चिन्ह पाहण्यात येत आहेत देशभरात बीजेपी ला स्वबळावर ३५० च्या आसपास जागा मिळत असलयाचे समजतेय.