Kanpur Accident Video: कानपूरमध्ये भरधाव कारने वकिलला चिरडले, अनेक वाहनांना धडक

या अपघाताचा (Accident) एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला आहे.

Kanpur Accident Video pc TW

Kanpur Accident Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर शहरात एक भीषण अपघात झाला. या अपघाताचा (Accident) एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला आहे. एका अज्ञात वाहन चालकाने एका व्यक्तीला चिरडले आहे. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. (हेही वाचा- अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये गोळीबारात 4 ठार, 9 जखमी; मृतांमध्ये एका भारतीयांचाही समावेश)

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र तीवारी असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पेशाने वकिल होता. ते नवाबगंज येथील रहिवासी होते. हा अपघात कंपनी बाग चौराहाजवळ घडला. कार चालकनाे रविंद्र तिवारी यांच्यासह अनेक वाहनांना धडक दिली. रविंद्र रस्त्यावर उभे त्यावेळी भरधाव कारने धडक दिली. हा अपघात इतका विचित्र होता की, अपघात पाहून स्थानिक देखील घाबरले.

कानपूर येथील अपघाताचा व्हिडिओ 

कार चालकाने तिवारी याला 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी झालेले तिवारी यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. तिवारी यांना धडक दिलेल्या कारवर राज्य सरकार असं लिहलेलं होते. या घटनेसंदर्भात चालक आणि कार मालक यांची अद्याप ओळख पटली नाही.