माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक: पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) पोलिस महासंचालक ओ पी सिंह (O.P Singh) यांनी स्मामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Harassment) आरोप करुन खंडणी मागणाऱ्या तरुणीला अटक केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री (Former Union Minister) आणि भाजप (BJP) नेते स्वामी चिन्मयानंद (Smami Chinmayanand) यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीला प्रयागराज (Prayagraj) येथील पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) पोलिस महासंचालक ओ पी सिंह (O.P Singh) यांनी स्मामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Harassment) आरोप करुन खंडणी मागणाऱ्या तरुणीला अटक केली आहे. विशेष तपास पथकाने (Special Investigation Team) याप्रकरणाचा छडा लावला आहे. ही तरुणी कायद्याचे शिक्षण (Law Student) घेत आहे. या तरुणीने 3 मित्रांसोबत मिळून पोलिसात चिन्मयानंद यांच्या विरोधात लैगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता.
शाहजहापूर येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानुसार स्वामी चिन्मयानंद यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनवण्यात आली होती. चिन्मयानंद यांच्यावर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाचा विशेष तपास पथक यांनी छडा लावला आहे. विशेष तपास पथकाने तरुणीच्या घरातून पुरावे गोळा केले असल्याची माहिती आयजी नवीन अरोडा यांनी दिली आहे. दरम्यान तरुणीचे 3 सहकारी संजय सिंह, सचिन सेंगर उर्फ सोनू आणि विक्रम यांनी स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून 5 कोटींची खंडणी मागितल्याची कबुली दिली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रयागराज उच्च न्यायालय या प्रकरणात लक्ष ठेवून आहे. हे देखील वाचा- जम्मू कश्मीर: IAF Air Base वर ऑरेंज अलर्ट जारी; Jaish-e-Mohammed आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारित असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा इशारा
ANI चे ट्वीट-
सोमवारी प्रयागराज येथील उच्च न्यायालयाने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या तरुणीची अटकेवर रोख लावण्याची मांगणी फेटाळली होती. मंगळवारी या तरुणीने स्थानिक न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायलयाने मंजूर केली होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.