Kota Rape Case: अभ्यास करण्याच्या बहाणे बोलवून 16 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, चार आरोपींना अटक

राजस्थानच्या कोटा येथे एका १६ वर्षीय तरुणीवर कोचिंग इन्स्टिट्यूटमधल्या चार विद्यार्थ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Kota Rape Case: अभ्यास करण्याच्या बहाणे बोलवून 16 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, चार आरोपींना अटक
Gang Rape प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Kota Rape Case:  राजस्थानच्या कोटा येथे एका 16 वर्षीय तरुणीवर कोचिंग इन्स्टिट्यूटमधल्या चार विद्यार्थ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर कोटात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुले हे 18 - 19 वयोगटातील आहे. पीडित मुलगी ही राजस्थान येथील रहिवासी नाही. आरोपींनी राहत्या भाड्याच्या खोलीत पीडित मुलीवर बलात्कार केला, ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी 5मे रोजी होणाऱ्या  NEET ची तयारी करण्यासाठी आली होती. (हेही वाचा-  दार्जिलिंग येथील महिलेस ओलीस ठेऊन सामूहिक बलात्कार)

मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटा येथे आली होती. पीडितेला एकत्र अभ्यास करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलं.  आरोपी मुलांनी खोलीत बोलावून तिच्याशी अभ्यासा विषयी बोलू लागले. थोड्यावेळाने तिला बळजबरीने पीडित मुलीवर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुलीने 13 फेब्रुवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पीडितेने तक्रारीत सांगितले की, आरोपींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोक्सो कायदा आणि संबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, ज्यामुळे चार संशयितांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कोटो सेंट्रल पोलिस करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).