Video: क्रिकेट कॉमेंट्रीचा केरळ पोलिसांनी केला असा वापर, लॉकडाउनमध्ये फिरणारे गेले पळून

असे असूनही लोकं लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. केरळ पोलिसांनी आता अशा लोकांसाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरवात केली आहे. लॉकडाउनचं पालन न करणाऱ्या नागरिकांजवळ आता हा ड्रोन पोहचणार आणि जोरात सायरन वाजायला सुरुवात करणार.

(Photo Credit: Twitter/TheKeralaPolice)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतासह (India) संपूर्ण देशात थैमान घातले आहे. देशात  4 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आणि हा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. असे असूनही लोकं लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लॉकडाउन तोडणाऱ्यांमुळे सर्व राज्यांचे पोलिस नाराज झाले आहेत. लोकांना वारंवार समजावून सांगितले जात आहे की घरी राहणे त्यांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. पण, नागरिक कोणाचेही ऐकण्यास तयार नाही. लॉकडाउनचे पालन न करणाऱ्यांना पोलिस वेगवेगळ्या प्रकारे धडे शिकवत आहे. या दरम्यान केरळ पोलीसने (Kerala Police) एक नाविन्यपूर्ण युक्ती शोधली आहे. केरळ पोलिसांनी आता अशा लोकांसाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचं पालन न करणाऱ्या नागरिकांजवळ आता हा ड्रोन पोहचणार आणि जोरात सायरन वाजायला सुरुवात करणार. (Coronavirus Impact: कोरोना व्हायरस, लॉकडाउन पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच जाहीर करु शकतं दुसरं आर्थिक पॅकेज)

केरळ पोलीसने याचं उद्धरण म्हणून एक व्हिडिओ शेअर केलाय. विशेष म्हणजे या व्हिडिओला क्रिकेटची कॉमेंट्री जोडली गेली आहे. केरळ पोलिसांनी ड्रोन पाहून पळत सुटलेल्या लोकांसह व्हिडिओमध्ये क्रिकेट कॉमेंट्री जोडून याला अधिकच मनोरंजक केले आहे. केरळ पोलिसांनी ट्वीट केलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिस ड्रोन जमावाचा पाठलाग करताना दिसून येत आहे. ड्रोन लोकांपर्यंत पोहोचतो आणि सायरन सुरु होतो. सायरनचा आवाज ऐकून लोक पळून जाऊ लागतात. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा त्यांच्या आवाजात 'ट्रेस ऑफ बुलेट्स' वर चर्चा करत आहेत. तुम्हीही पाहा:

भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र, अजुनही नागरिकांमध्ये त्याचं गांभीर्य दिसत नाही. दुसरीकडे, सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांवर आता सरकारकडून कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जाणार आहेत. महाराष्ट्रानंतर केरळ आणि तेलंगणा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.