Kathua Rape Case Verdict: कठुआ बलात्कार प्रकरणाचा निकाल जाहीर, 7 पैकी 6 जण दोषी

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील कठुआ (Kathua) येथे आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिची हत्या केल्याप्रकरणी आज पाठणकोट (Pathankot) येथील विशेष न्यायालयाने आरोपींविरुद्ध आज (10 जून) निकाल जाहीर केला आहे.

Kautha Rape Case Verdict (Photo Credits-ANI)

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील कठुआ (Kathua) येथे आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिची हत्या केल्याप्रकरणी आज पाठणकोट (Pathankot) येथील विशेष न्यायालयाने आरोपींविरुद्ध आज (10 जून)  निकाल जाहीर केला आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणी गावाचा प्रमुख सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, भाचा किशोर आणि त्याचा मित्र आनंद दत्ता यांनी अटक केली होती. त्याचसोबत पोलीस अधिकाी दीपक खजूरिया उर्फ दीपू, सुरिंदर वर्मा, परवेश कुमार उर्फ मन्नू, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि उपनिरिक्षक अरविंद दत्त यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणी सहा जणांना दोषी ठरविले आहे. तसेच एकाची सूटका करण्यात आली आहे.

कठुआ मध्ये बंजारा समुदायामधील 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करत हत्या केल्याची घटना 10 जानेवारी 2018 रोजी घडली होती. या प्रकरणी पंजाबमधील पाठणकोट स्थित एका विशेष न्यायालयात आज निकाल जाहीर करण्यात आला. तर 3 जून रोजी या प्रकरणावर बंद खोलीत सुनावणी करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाबाहेर कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पंधारा पानी आरोपपत्रानुसार, 10 जानेवारी 2018 रोजी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता.तर कठुआ जिल्ह्यातील एका गावातील मंदिरात या मुलीला बंधून ठेवत बलात्कार केला होता. तसेच चार दिवस बेशुद्ध करण्यात आल्यानंतर तिची हत्या केली गेली.(कठुआ बलात्कार प्रकरणी आज निकाल लागणार, न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा बंदोबस्त)

सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरच्या बाहेर या खटल्याची सुनावणी करण्यात यावी असे सांगितले होते. तर जम्मूपासून जवळजवळ 100 किमी आणि कठुआपासून 30 किमी दूर पाठणकोट येथील न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.