FTIIच्या सोसायटीमध्ये चक्क अनुप जलोटा यांची निवड
‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ म्हणजेच FTII, या चित्रपटनिर्मितीचे धडे देणाऱ्या अग्रगण्य संस्थेने नुकतीच आपल्या सोसायटी सदस्यांची यादी जाहीर केली.
‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ म्हणजेच FTII, या पुण्यातील चित्रपटनिर्मितीचे धडे देणाऱ्या अग्रगण्य संस्थेने नुकतीच आपल्या सोसायटी सदस्यांची यादी जाहीर केली. आश्चर्य म्हणजे या सदस्यांमध्ये भजनसम्राट अनुप जलोटा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली आहे. याचसोबत एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची वर्णी लागली आहे.
या कार्यकारणीमध्ये अनुप जलोटा, अभिनेत्री कंगना राणावत, येसू दास, अरविंद स्वामी, सतीश कौशिक, अर्चना सिंग, ब्रजेश सिंग यांचा महत्त्वाचा व्यक्ती म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर तर विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी,डॅनी डेंझोप्पा हे FTIIचे माजी विद्यार्थी असल्याने या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. सोबतच अनुपम खेर यांची FTIIच्या गव्हर्निंग बॉडीवर असलेली नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे, या नव्या कार्यकारिणीचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे.
मात्र अनुप जलोटायांची निवड ही विद्यार्थ्यांना फारसी रुचली नसल्याचे दिसून येत आहे. बिग बॉस 12 मध्ये आपल्या 37 वर्षीय लहान गर्लफ्रेंड जसलीनसोबत अनुप जलोटा यांनी प्रवेश केला. या वयातील अंतरामुळे या जोडीची चर्चा चांगलीच रंगली होती, आता पुन्हा केंद्रातील भाजप सरकारने FTIIच्या सोसायटीवर नियुक्ती केल्याने अनुप जलोटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.