ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायम खुले होते: राहुल गांधी
राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P.Nadda) यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कमळ हाती घेतले आहे.
काँग्रेसला (Congress) रामराम करुन ज्योतिरादित्य सिंधिया( Jyotiraditya Scindia) यांनी अखेर आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P.Nadda) यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कमळ हाती घेतले आहे. तसेच ज्योतिरादित्य सांधिया येत्या 13 मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदारीचा अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तुम्ही ज्योतिरादित्यांना भेटण्यासाठी वेळ देऊ शकला नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी राहुल गांधींना विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ज्योतिरादित्य सिंधिया ही एकमेव अशी व्यक्ती आहे, जिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायम खुले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. 'कर्जमाफी आणि रोजगाराच्या मुद्द्यात मध्य प्रदेश सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या 18 महिन्यात कमलनाथ सरकारने घोर निराशा केली', असे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत. तसेच गेल्या 18 वर्षात श्रद्धेने कार्य केले. काँग्रेस सोडताना मन दु:खी आहे, अशा शब्दात सिंधिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्त्वाला मान्यता मिळत नाही, असा आरोपही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची दिसत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सिंधिया यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वेळ देण्यात आला नाही. मात्र, सिंधिया ही अशी व्यक्ती होती ज्यांच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे नेहमीच खुले असतील, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपा पक्षप्रवेश; कॉंग्रेसवर गंभीर आरोप तर PM नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याच्या व्यक्त केल्या भावना
ट्वीट-
जोतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले आहे. तसेच ज्योतीरादित्य हे आज त्यांच्या कुटुंबात सामील होत आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, असे जेपी नड्डा म्हणाले आहेत. याशिवाय राजमाताजी आमच्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. आम्हाला योग्य दिशा देण्यात त्यांनी महत्वाचा वाट उचलला आहे, असेही ते म्हणाले आहेत.