Jharkhand Crime: झारखंड मध्ये मध्यधुंद अवस्थेत मुलानेच घेतला बापाचा जीव, आरोपी फरार, पोलीसांचा तपास सुरु

झारखंड राज्यात एका मुलांने मद्यधुंद अवस्थेत असताना वडिलांचा जीव घेतला आहे. या घटनेने राज्यात शोकाकुल परसली आहे.

Jharkhand Crime: दारूच्या नशेत लोकं काय करतील याचा नेम नसतो. अशीच धक्कादायक घटना झारखंड मध्ये घडली आहे. चक्क दारूच्या नशेत एका व्यक्तीने चक्क वडलांचा जीव घेतला आहे. वडिल्यांचा डोक्यावर लोखंडी रोडने मारल्याची घटना झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यातील  घडली आहे. मद्यपी मुलाने वयोवृध्द वडिलांच्या डोक्यात रागाच्या भरात मारलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.   स्थानिकांनी ताबडतोब पोलीसांना तक्रार केली.  काली भुईया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीसांना कळताच घटनास्थळी धाव घेतला. पोलीस येण्याच्या आधी आरोपी फरार झाला आहे. मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आणि त्याला पोस्टमार्टमसाठी पाठण्यात आला आहे. काली यांचा मुलगा मुन्नी भुईया (३५ वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत आपल्या मुलाला मारहाण करत होता. ते थांबवण्यासाठी व नातवाला वाचवण्यासाठी काली हे मध्ये पडले.

या हल्ल्याचा व घटनेला लेखी अर्ज मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now