Ahemadabad Video: स्वत: चा जीव धोक्यात घालून जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण, अहमदाबाद येथील घटना

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ahemadabad Suicide PC TW

Ahemadabad Video: अहमदाबाद येथे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा च्या पथकाने एका चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारणाऱ्या २१ वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अग्निशमन दलातील जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलीचे प्राण वाचवले आहे. या घटनेनंतर जवांनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (हेही वाचा- रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालून तरुणाने बिल्डिंगवरून मारली उडी, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अग्निशमन दलाला कॉल आला. गणेश फ्लोरा येथील अपार्टमेंटमध्ये मुलीने स्वत:ला कोंडून ठेवले आहे. माहिती मिळताच, अग्निशमन दला घटनास्थळी पोहचले आणि मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी फ्लॅटच्या समोरील ब्लॉकमध्ये चौथ्या मजल्यावरील दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये एक टीम तैनात करण्याता निर्णय घेतला. त्याच विंगच्या पाचव्या मजल्यावर आणखी एक पथक तैनात करण्यात आले. त्याचबरोबर एक टीम खाली तैनात करण्यात आले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अग्निशमन दलाचा जवान पाचव्या मजल्यावरून तरुणीला वाचवण्यासाठी उडी मारून तिला सुरक्षितपणे आणण्याचा प्रयत्न केला. तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली.

पहा व्हिडिओ 

हे पाहून जमावांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. तरुणीने इतके टोकाचे पाऊल कश्यामुळे उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.