खुशखबर! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मोदी सरकाचे मोठे गिफ्ट; मदत म्हणून मिळणार 2.5 लाख रुपये

ही योजना आजही चालू आहे, समाजात पसरलेल्या जातिव्यवस्थेच्या दुष्टपणाचा नाश करण्याचा केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश आहे. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट अटींचे पालन करावे लागेल

Representational image (Photo Credits: Unsplash)

मोदी सरकार (Modi Government) लोकांची विचारसरणी बदलण्यासाठी आणि जनतेचा फायदा होण्यासाठी देशात विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. यापैकी एक योजना जातिव्यवस्थेतून होणारे सामाजिक अत्याचार थांबवणे आणि आंतरजातीय विवाहांना (Intercaste Marriage) प्रोत्साहन देण्यासाठी लागू केली जात आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाहामधील दोघांपैकी एक व्यक्ती दलित असेल, तर सरकार त्यांना चक्क अडीच लाख रुपये देणार आहे. आंतरजातीय विवाहद्वारे सामाजिक एकत्रीकरणासाठी डॉ. आंबेडकर योजने अंतर्गत नवीन लग्न झालेल्या जोडप्याला ही आर्थिक मदत दिली जाईल.

ही योजना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने वर्ष 2013 मध्ये सुरू केली होती. ही योजना आजही चालू आहे, समाजात पसरलेल्या जातिव्यवस्थेच्या दुष्टपणाचा नाश करण्याचा केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश आहे. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट अटींचे पालन करावे लागेल. ही मदत मिळवण्यासाठी लग्नानंतर एक वर्ष पर्यंत मुदत असणार आहे.

शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम, नवविवाहितांना आपल्या क्षेत्रातील आमदाराच्या शिफारशीसह डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे अर्ज सादर करावा लागेल. यासाठी लग्न झालेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती दलित असणे गरजेचे आहे. दोघांचा विवाह हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत नोंदणीकृत असावा. या संदर्भात जोडप्यांना शपथपत्र दाखल करावे लागेल. ही योजना फक्त नवविवाहित जोडप्यांसाठीच आहे, तसेच दुसऱ्या लग्नासाठी ही योजना लागू होणार नाही.