शत्रूंवर भारी पडणार INS Vikrant, 'या' दिवशी नौदलात होणार दाखल
व्हाइस अॅडमिरल घोरमाडे म्हणाले की, आयएनएस 'विक्रांत'चा नौदलात समावेश हा एक ऐतिहासिक प्रसंग असेल आणि 'राष्ट्रीय एकात्मतेचे' प्रतीक असेल कारण त्याचे घटक अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आले आहेत.
स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) पूर्णपणे सज्ज झाली आहे. नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे (SN Ghormade) यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, INS 'विक्रांत'च्या कार्यान्वित झाल्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यात मदत होईल. INS 'विक्रांत' 2 सप्टेंबर रोजी कोची येथे एका कार्यक्रमात नौदलात सामील होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची उपस्थिती असणार आहे. ते म्हणाले की विमानवाहू नौकेचा सेवेत समावेश हा एक "अविस्मरणीय" दिवस असेल कारण हे जहाज देशाच्या एकूण सागरी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल. व्हाइस अॅडमिरल घोरमाडे म्हणाले की, आयएनएस 'विक्रांत'चा नौदलात समावेश हा एक ऐतिहासिक प्रसंग असेल आणि 'राष्ट्रीय एकात्मतेचे' प्रतीक असेल कारण त्याचे घटक अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आले आहेत.
INS विक्रांत 20 हजार कोटी खर्चून बांधली
सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या विमानवाहू जहाजाने गेल्या महिन्यात समुद्रातील चाचण्यांचा चौथा आणि अंतिम टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. 'विक्रांत'च्या निर्मितीसह, भारत देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे ज्यांच्याकडे स्वदेशी डिझाइन आणि विमानवाहू जहाज तयार करण्याची क्षमता आहे. (हे देखील वाचा: Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)
जाणून घ्या INS विक्रांतची खासियत
भारतातील सर्वात मोठी स्वदेशी युद्धनौका INS विक्रांतची केबल लांबी सुमारे 2,500 किमी आहे. INS विक्रांतची लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि उंची 59 मीटर आहे. विक्रांतचा फ्लाइट डेक दोन फुटबॉल मैदानांएवढा आहे, जिथून विमाने उडतील. या युद्धनौकेचा वेग 28 नॉट्स असून 7,500 नॉटिकल मैलांपर्यंत प्रवास करण्याची क्षमताही आहे. विमानवाहू नौकेत आठ पॉवर जनरेटर आहेत जे संपूर्ण कोची शहर उजळण्यास सक्षम आहेत. या विमानवाहू जहाजाच्या कॉरिडॉरची एक फेरी आठ किलोमीटर इतकी बसते. या युद्धनौकेत 2,300 कप्पे बनवण्यात आले असून, त्यात 1,700 जवान बसू शकतात.