UP College Students Kissing Video: उत्तर प्रदेशातील संतापजनक घटना, वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांचे अश्लिल चाळे, Viral व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले
याच शाळेत आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे शिकवले जातात.
UP College Students Kissing Video: मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी शाळा आणि कॉलेज मोलाची कामगिरी करत असते. याच शाळेत आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे ही शिकवले जातात. उत्तर प्रदेशातील कॉलेजमधील एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यात विद्यार्थी वर्गाच्या बाहेर अश्लिल चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकरी संतापले आहे. (हेही वाचा- चेन्नईत चालत्या गाडीचे सनरूफ उघडून जोडपे करत होते दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिकवला धडा)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील गौतम बुध्द नगर येथे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ही घटना घडली. कॉलेजमधील दोन विद्यार्थी अश्लिल चाळे करत असताना आढळले आहे. धक्कादायक म्हणजे एकाने लांबून यांचा व्हिडिओ शूट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शाळेच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन विद्यार्थी वर्गाच्या बाहेर उभे आहे. आजूबाजूला कोणी नसताना, एकमेकांना चुंबन (Kiss) करताना दिसत आहे. लांबून एकाने यांचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. या व्हिडिओची तपासणी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती नेटकऱ्यांनी नोएडा पोलिसांकडे केली आहे. (हेही वाचा- पंजाबची लोकप्रिय इंफ्लुएंसर अमन रामगढियाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; इंस्टाग्रामवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- 'माझीच चूक झाली...')
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. 1 मिनीट 33 सेंकदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. लवकरच पोलिस या प्रकरणी कारवाई करतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मुलं अल्पवयीन असल्याचे एकीकडे बोललं जात आहे.