'एमएस धोनी भाजपमध्ये सामील होणार का?' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर Netizensची माजी भारतीय कर्णधाराच्या राजकारणात प्रवेशाविषयी चर्चा
नेटकऱ्यांनी धोनी निवृत्तीनंतर काय करणार यावर चर्चा सुरु केली. या विषयावर अनेकांनी तो भारतीय जनता पार्टी (भाजपा) पक्षात सामील होईल असे अनुमान लावले.
भारतीय क्रिकेट संघाचा 'ग्रेट फिनिशर', 'कॅप्टन कूल' अशी ओळख असलेल्या माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्सिट पक्की केली. धोनीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे समर्थन आणि पाठिंब्यासाठी चाहत्यांचे आभार मानले. धोनीने आपले आवडते गायक मुकेश यांचं ‘मैं पल दो पल का शायर हूं’ हे गाणं शेअर करत निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मात्र सोशल मीडियावर त्याच्या सहखेळाडूं सोबत चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी त्याला दुसऱ्या इंनिंगसाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी भारतीय क्रिकेटसाठी त्याने जे केले त्यासाठी त्याचे आभार मानले. पण, काहींनी तर तो निवृत्तीनंतर काय करणार यावर चर्चा सुरु केली. या विषयावर अनेकांनी तो भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janta Party) पक्षात सामील होईल असे अनुमान लावायलाही सुरुवात केली. (अजब योगायोग! एमएस धोनी यांच्या कारकिर्दीची सुरुवात व अखेर रनआऊटनेच, पाहा कॅप्टन कूलच्या पहिल्या आणि अंतिम मॅचमधील Coincidence Watch Video)
दरम्यान, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त (Dhoni Retires) झाला असला तरी तो आयपीएल खेळत राहील असं त्याने म्हटलं. धोनीने वयाच्या 18 व्या वर्षी 1999-2000 रणजी ट्रॉफीमधून सुरुवात केली. धोनीच्या दुसऱ्या इंनिंगवर पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
धोनी झारखंड भाजपचा मुख्यमंत्री चेहरा
अफवा: - धोनी लवकरच भाजपमध्ये सामील होणार
धोनी भाजपमध्ये सामील होत नाही का? ?
धोनी आणि सुरेश रैना भाजपमध्ये सहभागी होण्याची कल्पना करा...
तो एका सेकंदात सामान्य होईल
धोनी आता भाजपमध्ये सामील होणार ...
भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक आहे. तो जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्यानं आपल्या संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी मिळवून दिल्या. 2019 विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती जाहीर केली होती. संपूर्ण स्पर्धे दरम्यान धोनीच्या संथ खेळीची चर्चा होत राहिली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात संघात रिषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीने पुन्हा संघात परत यावे अशी मागणी होत होती.