IPL Auction 2025 Live

New Rule From November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार 'हे' सरकारी नियम; तुमच्या खिशावर 'असा' होणार परिणाम? वाचा सविस्तर

1 नोव्हेंबरपासून होणार्‍या बदलांबद्दल जाणून घेऊया...

प्रतिकात्मक फोटो | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

New Rule From November: नोव्हेंबर महिना सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला आहे. 1 नोव्हेंबर रोजी देशात अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी या बदलांची जाणीव असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही ती कामे वेळेत पूर्ण करू शकाल आणि कोणत्याही प्रकारची समस्या टाळता येईल.

या नियमांमध्ये विम्याचे केवायसी, एलपीजी सिलिंडरची किंमत, ट्रेनची वेळ आणि सबसिडीशी संबंधित नियमांचा समावेश आहे. 1 नोव्हेंबरपासून होणार्‍या बदलांबद्दल जाणून घेऊया...(हेही वाचा - Most Polluted City In Asia: आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 शहरे; कोणते शहर आहे आघाडीवर? जाणून घ्या)

एलपीजी सिलेंडरची किंमत -

एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती सरकार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर करतात. दर महिन्याला गॅसच्या किमतींचा आढावा घेऊन हे बदल केले जातात. अशा परिस्थितीत दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅसच्या किमतीत घट किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबर रोजी 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या आणि 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. 1 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपयांनी कमी झाली.

केवायसी नियम -

सध्या, नॉन-लाइफ इन्शुरन्स खरेदी करताना केवायसी अनिवार्य नाही, परंतु 1 नोव्हेंबरपासून, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ते अनिवार्य करू शकते. यानंतर, नवीन आणि जुन्या दोन्ही विमाधारकांना केवायसी करणे अनिवार्य असेल.

ट्रेनच्या वेळा -

वृत्तानुसार, 1 नोव्हेंबरपासून देशातील गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. देशभरातील शेकडो ट्रेनवर याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलामुळे ज्या प्रवाशांनी 1 नोव्हेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबरची तिकिटे काढली आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी, तुम्हाला ट्रेनच्या वेळा माहित असणे आवश्यक आहे.

दिल्लीत वीज सबसिडी -

देशाची राजधानी दिल्लीतील सर्व लोकांना 1 नोव्हेंबर पासून सबसिडी मिळणे बंद होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ज्या लोकांनी वीज सबसिडीसाठी नोंदणी केली आहे त्यांनाच दिल्ली सरकारकडून सबसिडी दिली जाईल.