New Rule from 1st June 2024: पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' आर्थिक नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, बँका जूनमध्ये 10 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. राजा संक्रांती आणि ईद-उल-अधासारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँक बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी नक्कीच तपासा.
New Rule from 1st June 2024: मे महिना संपत आला असून काही दिवसांत जून महिना सुरू होणार आहे. जून महिना सुरू होताचं अनेक आर्थिक नियम बदणार आहेत. जून महिन्यात पैशांशी संबंधित नियमही बदल होणार आहेत. 1 जून 2024 पासून कोणते नवीन आर्थिक नियम लागू होतील ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात.
एलपीजी सिलेंडरची किंमत -
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडर (LPG Cylinder Price) च्या किमती अपडेट करतात. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली. घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 1 जून 2024 रोजी अपडेट केल्या जातील. (हेही वाचा - India's Unemployment Rate: भारतात बेरोजगारीचा दर वाढला; शहरी भागात 6.7 टक्के लोक बेरोजगार; सर्वेक्षणातून माहिती समोर)
बँकांना सुट्टी -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, बँका जूनमध्ये 10 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. राजा संक्रांती आणि ईद-उल-अधासारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँक बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी नक्कीच तपासा. (हेही वाचा -Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी; konkanrailway.com वर करा अर्ज)
परवान्याशिवाय, वाहन चालवल्यास मोठा दंड -
वैध परवान्याशिवाय, वाहन चालवल्यास मोठा दंड आकारला जाईल. हा दंड 1,000 वरून 2,000 रुपये केले जाईल. याशिवाय, अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास, त्याच्या/तिच्या पालकांवर कारवाई केली जाईल. तसेच वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही सुलभ केली जाणार आहेत. याचा अर्थ मंत्रालय अर्जदारांना कोणत्या प्रकारच्या परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करू इच्छित आहे याबद्दल आगाऊ माहिती देईल.
तथापी, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तशीच राहील. अर्जदार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. https://parivahan.gov.in/. तथापि, ते मॅन्युअल प्रक्रियेद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या संबंधित आरटीओला देखील भेट देऊ शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)