SBI ग्राहकांसाठी खुशखबर! होम लोन वरील व्याजदरात कपात
त्यामुळे आता MCLR रेट 8.25 टक्के कमी होऊन 8.15 टक्क्यांवर करण्यात आल्या आहेत. एमसीएलआर मध्ये करण्यात आलेली ही कपात 10 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.
भारतीय स्टेट बँकेने पुन्हा एकदा MCLR रेट मध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता MCLR रेट 8.25 टक्के कमी होऊन 8.15 टक्क्यांवर करण्यात आल्या आहेत. एमसीएलआर मध्ये करण्यात आलेली ही कपात 10 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच अन्य बँकांसुद्धा याच मार्गाचा अवलंब करताना दिसून येणार आहेत. यामुळे होम लोन वरील व्याजदर कमी होणार आहे.
बँकेच्या मते 10 सप्टेंबर पासून एका वर्षापर्यंत एसबीआय एसएलआर 8.15 टक्के असणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान बँकेने तिसऱ्या वेळेस एमसीएसआरमध्ये कपात केली आहे. तसेच एसबीआयने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात चतुर्थांश टक्के कपात केली आहे. एमसीएलआर म्हणजे मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लँडिंग रेट.(CAR LOAN, PERSONAL LOAN यांसह SBI देत आहे अनेक ऑफर्स; सोबतच देशभरात 10 लाख YONO Cash Points सुद्धा स्थापना करणार; घ्या जाणून)
MCLR कमी झाल्याने होम लोनवरील व्याजदर किंवा इएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही आहे. एसबीआयच्या फ्लोटींग रेट होम लोन हे एका वर्षाच्या एमसीएलआर सोबत जोडला गेलेला असतो. त्यामुळे या एका वर्षासाठी निश्चित रेट ठरवण्यात येतो. एसबीआय होम लोन आणि ऑटो लोन बाजारात क्रमश: 35 टक्के आणि 36 टक्के असा आहे.